कल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

कल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन

 कल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन

निरोगी जीवनासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावेअंजलीताई देवकर-वल्लाकट्टी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर-कल्याणरोड परिसरात प्रथमच लेडीज जिमचा शुभारंभ झाला आहे.यामुळे शहरातील महिलांना आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. जीके लेडीज फिटनेस या जिम मध्ये अत्याधुनिक अश्या सुविधा आहेत. निलमताई खंडागळे यांनी जिम सुरु करून महिलांना आरोग्य निरोगी व सुदृढ राखण्यासाठी संधी निर्माण केली आहे. खंडागळे परिवाराने सुनेला पाठींबा देऊन जिम सुरु करण्यास प्रोत्साहन दिले ही अभिमानास्पद बाब आहे. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निरोगी आरोग्याची आवश्यकता आहे. महिला निरोगी राहिल्यास कुटुंब निरोगी राहते. निरोगी जीवनासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांनी केले.
शिवाजीनगर कल्याण रोड येथील भावना ऋषी येथे महिलांसाठी जीके फिटनेस लेडीज जिमचे उदघाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे, देवेंद्र कवडे, पै.भैरवनाथ खंडागळे, नगरसेवक गणेश कवडे, दगडूमामा पवार, दत्तात्रय मुदगल, जितेंद्र वल्लाकट्टी, डॉ.दीपक कारखेले, नगरसेविका सोनालीताई चितळे, वैशालीताई नळकांडे, सविताताई शिंदे, कैलास दळवी, गणेश खंडागळे, नीलमताई खंडागळे, प्रा.उत्तमराव राजळे, गंगाधर खंडागळे, पै.गोरख खंडागळे, बजरंग शेळके, मनोहर शिंदे, किरण खंडागळे, निखील सोनवणे, मंगेश घोरपडे, नितीन थोरात, पप्पू गारदे आदी उपस्थित होते. सुहासभाई मुळे म्हणाले,नगर शहरात खंडागळे परिवाराने लेडीज जिमचे उद्घाटन करून महिलांसाठी चांगला उपक्रम राबविला आहे.या जिमचा महिलांनी फायदा घेऊन आरोग्यसंपन्न व्हावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here