केमिस्ट असो.च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलनास प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

केमिस्ट असो.च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलनास प्रारंभ

 केमिस्ट असो.च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलनास प्रारंभ

श्रीरामांचे विचार युवकांना मार्गदर्शक : दत्ता गाडळकर

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येतील राम मंदिर निर्माण कामाचा शुभारंभ केला आहे. आता प्रत्येक नागरिकाने मंदिर उभारणीमध्ये आपला सिंहाचा वाटा उचलावा. यासाठी नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने निधी संकलनाचे काम सुरु केले आहे. यामधून मोठा निधी उपलब्ध करु. श्रीरामाचे विचार आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे. आपली युवा पिढी ही धार्मिकतेकडे वळावी व सुसंस्कृत व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केमिस्ट असोसिएशनने नेहमीच सकारकात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केले.
   नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने आयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनास प्रारंभ केला. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक श्रीकांत जोशी, शहर कार्यवाहक हिराकांत रामदासी, महेंद्र भाई चंदे, अजय गांधी, हिम्मतभाई शाह, सुधीर लांडगे, आनंद बोरा, संजय गुंदेचा, महेंद्र अनमल, देविदस काळे, अमित धाडगे, नितीन गांधी, सागर मुथा, मनोज खेडकर, अशोक रेणुगुंटला, मिलिंद क्षीरसागर, राहुल गोरे, निलेश डफळ, अभिजित गांगर्डे, राहुल गोरे, अभिजित बिहाणी, वर्धमान पितळे, संदीप कोकाटे, सागर पटवा, महेंद्र राऊत, सिकंदर पाल, रिनूल गवळी, पराग झावरे, किरण रासकर आदी यावेळी उपस्थित होते.
   केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक हिम्मतभाई शाह यांनी आयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी पहिला निधीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक श्रीकांत जोशी यांच्याकडे सुपूर्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here