आयोध्येतील राममंदिर हे धार्मिकतेचे प्रतिक : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

आयोध्येतील राममंदिर हे धार्मिकतेचे प्रतिक : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 आयोध्येतील राममंदिर हे धार्मिकतेचे प्रतिक : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः गेल्या अनेक वर्षांपासून आयोध्येमध्ये राममंदिर उभे रहावे, ही सर्व हिंदुस्थानची इच्छा आहे. आयोध्येतील श्रीराम मंदिर हे धार्मिकतेचे प्रतिक आहे. आज हे भव्यदिव्य मंदिर उभे रहावे, यासाठी भाजपाच्यावतीने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागेचा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे आज या ठिकाणी राम मंदिर उभारणीस प्रारंभ झाला. यासाठी सर्व देशातील नागरिकांचा श्रीराम मंदिर उभारणीच्या धार्मिक कामास हातभार लागावा. यासाठी निधी संकलनाचे काम सुरु केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करावी व मंदिर उभारणीच्या कामात आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
बुर्‍हाणनगर येथे आयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी निधी संकलनाची सुरवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक श्रीकांत जोशी, शहर कार्यवाहक हिराकांत रामदासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर शहर बौद्धिक प्रमुख रोहित देशपांडे, सतीश लोहगावकर, श्रीनिवास नाबरिया, जगदीश देशमुख, रामेश्वर बुंदले, प्रमोद तरवडे, बाळासाहेब कर्डिले, दगडू पानसरे, निंबाळकर व बाणेश्वर मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकांत जोशी म्हणाले की, श्रीराम हे धार्मिकतेचे मूर्तीमंत स्वरुप आहे. श्रीराम जन्मभूमीवर भव्यमंदिर ही भारतीय मनाची शाश्वत प्रेरणा आहे. यासाठी श्रीराम भक्तांनी 492 वर्षे अविरत संघर्ष केला.

No comments:

Post a Comment