अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा ! हा देश हिंदूंचा- धनंजय देसाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा ! हा देश हिंदूंचा- धनंजय देसाई

 हिंदू राष्ट्र सेनेची मागणी..

अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा ! हा देश हिंदूंचा- धनंजय देसाई

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः हा देश हिंदूंचा आहे, त्यामुळे आता या परकीयांनी दिलेली शहराचे नावे बदलली गेली पाहिजे. हळूहळू ती बदलतही आहे, परंतु यात अनेकजण आडकाठी आणत आहे. तेव्हा समस्त हिंदू एक होऊन यासाठी लढा दिला पाहिजे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि अहमदनगरचे अंबिकानगर हे नाव झालेच पाहिजे, त्यासाठी हिंदू राष्ट्र सेना कायम आग्रही राहील, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई  यांनी केले. हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई नगरमध्ये आले असता शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आले.
   आज मंदिरे, देवस्थाने ही आपले प्रेरणास्थान आहेत. यांचा विकास झाला पाहिजे, भाविकांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे. नगरमधील श्री विशाल गणेश मंदिराचा झालेले जिर्णोद्धार नेत्रदिपक असाच आहे. त्यामुळे या मंदिराची प्रचित सर्वदूर पोहचत आहे. अनेक शहराची नावे जी आपल्या आराध्य देवतांच्या व तेथील श्रद्धांस्थांवरुन ठेवण्यात आली होती. त्याकाळी परकियांनी आपल्या ताकदीच्या जोरावर आक्रमण करुन देशातील अनेक देवस्थाने, शहरे उद्धवस्त केली. त्याचप्रमाण शहराची नावेही बदलली. परंतु आता हा इतिहास पुसून परकीयांनी दिलेली नावे बदलली पाहिजे असे ही देसाई म्हणाले याप्रसंगी देसाई बोलत होते. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, नगरसेवक योगिराज गाडे, नितीन उदमले आदि उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर यांनी देवस्थानच्यावतीने मंदिराच्या झालेल्या जिर्णोद्धार कामाची माहिती धनंजय देसाई यांना देऊन त्यांचा देवस्थानव्यावतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment