शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून राष्ट्रप्रेमाची शिकवण- आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून राष्ट्रप्रेमाची शिकवण- आ. संग्राम जगताप

 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून राष्ट्रप्रेमाची शिकवण- आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः  नगर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याजंयती निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आजच्या युवकांना त्याच्या राष्ट्रप्रेमाची शिकवण घेण्याची गरज आहे. त्याच्या संघर्षमय जीवनातून त्यांनी समाज घडवण्याचे काम केले होते. आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करता ते आपले काम नियतीने करत होते. समाजाच्या उन्नतीसाठी अखंड प्रयत्न करत राहिले. आपल्या जीवनामध्ये देशहिताला प्राधान्य क्रम दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला स्वांतत्र्य करण्यास पुढाकार घेतला होता तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वांतत्र्य भारताच्या जनतेला मार्गदर्शन करण्यास पुढाकार घेतला होता. या महान व्यक्तीनी आपआपले जीवन राष्ट्रासाठी अर्पुण आपले जीवन सार्थ केले होते. आपणही यांच्या तत्त्वाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनामध्ये अंगीकारावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जंयती निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना आमदार संग्राम जगताप समवेत शहर जिल्हा अध्यक्ष माणीक विधाते, म.न.पा. विरोधी पक्ष नेता संपत बारसकर, नगर सेवक अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, संभाजी पवार, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment