निमगाव वाघात विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जागृती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

निमगाव वाघात विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जागृती

 निमगाव वाघात विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जागृती

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम, विद्यार्थ्यांना मास्क तर शाळेला सॅनीटायझरची भेट

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीसाठी नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन मास्कचे वाटप करण्यात आले. तर शाळेला सॅनीटायझरची भेट देण्यात आली.
   डॉ. महेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना सदृढ व निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनेची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, रामेश्वर चेमटे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, मयुर काळे, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, नवनाथ फलके आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
   मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी शाळा सुरु होत असताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पै.नाना डोंगरे यांनी कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना लस आली असली तरी गाफील राहून चालणार नाही. ही महामारी हद्दपार करण्यासाठी जागृती व सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ पळसकर यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment