भिंगारमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबीर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

भिंगारमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

 भिंगारमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
भिंगार ः स्व.डॉ.सविता पंडित यांच्या स्मरणार्थ भिंगार- सौरभनगर मधील पंडित हाँस्पिटल अँड मँटर्निटी होम मध्ये 27 ते 29 जानेवारी रोजी महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून अगदी सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येणार आहे.
    लँप्रोस्कोपी तज्ञ  डॉ.ऋषिकेश पंडित हे स्वतः तपासणी करणार आहेत.शिबीरामध्ये गर्भाशय न काढता गाठी काढणे, गर्भ नलिकेतील ब्लॉकेज काढणे, गर्भाशय काढणे, गर्भाशयातील पडदा काढणे, फिच्युला सर्जरी, प्रोलँप्स सर्जरी, एण्डोमेट्रीओसीस सर्जरी, अंडाशयाच्या गाठी काढणे, लँप्रोस्कोपीक गर्भाशयाच्या कँसर सर्जरी, वंध्यत्व निवारण सर्जरी, पि सी ओ डी सर्जरी, अंग बाहेर येत असल्यास गर्भाशय न काढता दुरबिणीद्वारे शस्त्रक्रिया, शिंकताना, खोकताना लघवी होणे, काँस्मेटिक सर्जरी आदी सवलतीच्या दरात होणार आहे.
दरवर्षी होणार्‍या या शिबिरात अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे.3ऊ लँप्रोस्कोपीची नगर जिल्ह्यातील पहिली व एकमेव सुविधा व दुरबिणीद्वारे गर्भाशयाच्या कँसरची शस्त्रक्रिया करणारे एकमेव सेंटर असल्याने परजिल्ह्यातील महिला रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
   महिला रुग्णांनी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9146444319 व 9561255892 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here