राहुरी बसस्थानक इमारतीचा काही भाग कोसळला ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

राहुरी बसस्थानक इमारतीचा काही भाग कोसळला !

 राहुरी बसस्थानक इमारतीचा काही भाग कोसळला !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः आज पहाटे राहुरी बस स्थानकाच्या इमारतीच्या प्रवेश द्वारा जवळील कॉलम बीमचा एक भाग तुटून गजासह लोंबकत पडल्याने बस स्थानकात येणारे जाणारे प्रवाशी भयभीत झाले असून ह्या कडे एस टी महा मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी ह्यांचे पूर्ण दुर्लक्ष होत असून भविष्यात या बस स्थानकात जर एखादी दुर्घटना घडल्यास त्यास एस टी महा मंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी जबाबदार धरले जातील असा इशारा  माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी आज दिला आहे.
राहुरी बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्न एवढा गंभीर झालेला बस स्थानकातील इमारतीत दररोज कोणताना कोणता भाग पडत असून आज पहाटे वा मध्य रात्री बस स्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारा लगतच्या एका बाजूचा सिमेंट काँक्रिटच्या कॉलम बीम चा भाग गजासह तुटून पडला होता हे काही सामाजिक कार्यकर्ते पत्रकार ह्यांचे लक्षात येताच त्यांनी सदर घटनेचे चित्रीकरण करुन सोशल मीडिया वर तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांना सांगितले असता श्री तनपुरे ह्यांनी आज सकाळी सदर घटनेची पाहणी करुन एस टी च्या विभागीय नियंत्रक ह्यांचेशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही एस टीच्या स्थानिक अधिकारी ह्यांनी मोबाईल केला असता त्यांचाही कॉल रिसिव्ह केला नाही. वास्तविक राहुरी बस स्थानकाच्या इमारतीच्या प्रश्नावर माजी खासदार प्रसाद तनपुरे तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी ह्या बाबत एस टीच्या अधिकार्‍यांच्या अनेक वेळा बैठका घेऊन 46वर्षा पूर्वी बांधलेल्या ह्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करून घेण्याची मागणी करून बस स्थानकाच्या इमारतीचा जो जीर्ण झालेला भाग आहे तो पूर्ण पणे काढून घेण्याची मागणी वर्ष भरा पूर्वी केली होती. पण त्याकडे एस टी च्या वरिष्ठ अधिकारी ह्यांनी दुर्लक्ष केले. प्राजक्त तनपुरे आमदार झाले मंत्री झालेवर त्यांनी एस टीच्या वरिष्ठ अधिकारी ह्यांची राहुरी व मुंबई येथे बैठक घेऊन ही इमारत पूर्ण पाडून नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले त्यासही अधिकारी पातळीवर उशीर केला गेला माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांच्या सातत्याने करीत असलेल्या पाठपुरावा लक्षात घेऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी सदर इमारतीचा 18कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करुन तो प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. दरम्यान राहुरी बस स्थानकाच्या ह्या इमारतिच्या कन्ट्रोल कॉबीनचा भाग काही दिवसापूर्वी पडला वास्तविक ह्या कन्ट्रोल कॉबीन मध्ये स्थानक प्रमुख ह्यांचे सह चालक वाहक बसलेले असतात.  त्यांनी ह्याबाबत वरिष्ठ अधिकारी ह्यांना सांगून त्यांनी ह्या इमारतीच्या बाबत लक्ष घातलेले नाही. बस स्थानकाच दर्शनिय भाग पूर्ण पणे पडण्यास आला आहे. बस स्थानक परिसरातील मुतारीमध्ये प्रचंड दुर्गंधी अस्वछता आहे.बस स्थानकात येणार्‍या जाणार्‍या प्रवाशी नागरिक ह्यांना जीव मुठीत धरून जा ये करावी लागते.
बस ज्या ठिकाणाहून आत बाहेर जातात तिथे मोठं मोठे खड्डे पडले असून येथील रिक्षा चालक ह्यांनी बुजविण्याचा प्रयत्न केला पण त्याकडे एस टीच्या वरिष्ठ अधिकारी ह्यांना लक्ष देण्यास वेळ नाही.
आज राहुरी बस स्थानकात पत्राची शेड वगता इतर भाग कधी पडेल ह्याचा भरवसाच राहिलेला नाही. ह्यासाठी एस टी महा मंडळाने बस स्थानकाची आहे ती इमारत तातडीने पाडून टाकावी अन्यथा सदर काम ग्रामस्थांना हाती घ्यावे लागेल असा इशारा प्रवाशी वर्गाने दिला आहे.

No comments:

Post a Comment