नेवासा काँग्रेसचे अर्णबला जोडे मारो आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

नेवासा काँग्रेसचे अर्णबला जोडे मारो आंदोलन

 नेवासा काँग्रेसचे अर्णबला जोडे मारो आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीं याच्या विरोधात नेवासा काँग्रेसने तहसील कार्यलयावर निषेध मोर्चा काढून, जोडे मारो आंदोलन केले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीच्या व्हाट्सएप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला या कारवाईची माहीती अर्णब गोस्वामीला घटनेच्या तीन दिवस आधीच माहिती होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी कडे कशी आली?
तीन दिवस आधी ही माहिती कशी मिळाली ?  त्याने अजुन कोणाला ही माहिती दिली का ?  तसेच गोस्वामींने स्वतः सांगितले की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे त्यामुळे सर्व प्रकारची चौकशी होणे गरजेचे आहे.गोस्वामीं चे हे कृत्य  ेषषळीळरश्र ीशलीशरीीं रलीं1993 ीशल .5 नुसार कार्यालयीन गोपनीयता भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नेवासा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
व्हाट्सएपच्या चॅटवरून गोस्वामीं याचे पंतप्रधान, गृहमंत्री, यांच्यासह सरकारमधील मंत्र्याशी अत्यंत निकटचे संबंध असल्याचे दिसून येत आहे, तसेच पुलवामा हल्ला मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे तो निवडणूक जिंकेल असा उल्लेख या  चाटमध्ये आहे.
त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का ? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली,
यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी गोस्वामीचे हे कृत्य राष्ट्रद्रोहाचा भाग असून या प्रकरणात गोस्वामींला मदत करणार्‍या उच्चपदस्थांवर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली.
शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी गोस्वामींवर कारवाई न झाल्यास यापेक्षाही वेगळे आंदोलन करण्यात येणार असे स्पष्ट केले.
आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष कार्लस साठे,  जिल्ह्या सेक्रेटरी सुदामराव कदम, एससी विभागाचे राजेंद्र वाघमारे, रमेश जाधव, संघटक संदीप मोटे , सरचिटणीस प्रवीण तिरोडकर,  युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, मीडिया प्रमुख सचिन बोर्डे, एससी विभाग जिल्हाकार्यध्यक्ष कमलेश गायकवाड,   एनएसयुआईचे सौरभ कसावणे, समीर शेख, अक्षय फुगे, अभिषेक गायकवाड, काँग्रेस सेवादलाचे अरुण सरोदे, उपाध्यक्ष सुनिल भोंगे , सतीश तर्‍हाळ, सुरेंद्र मडलिक, साहेबराव पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment