बायपासचे काम मार्गी लावा अन्यथा रस्ता रोकोचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

बायपासचे काम मार्गी लावा अन्यथा रस्ता रोकोचा इशारा

 बायपासचे काम मार्गी लावा अन्यथा रस्ता रोकोचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अर्धवट अवस्थेतील वाळूंज शिवारातील बायपास रोडचे काम आठ दिवसाच्या आत त्वरीत मार्गी लावावे अन्यथानगर सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांनी सांगीतले याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे .
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उददेशाने  बाहयवळण रस्ता करण्यात आता. वाळूंज सोलापूर ते केडगांव पुणे रस्त्यापर्यंत राज्य सरकारणे सुमारे 39 किलो मिटर रस्त्यावर सुमारे तीस कोटी रुपये खर्च करुन बाहयवळण रस्त्याच्या कामास डिसेंबर 2004 मध्ये प्रशासकीय मंजूरी दिली होती.
 बाहयवळण रस्त्याच्या डागडुजीसाठी कोटयावधी रुपयांचे काम एका खाजगी एजन्सीला दिलेले होते. परंतू सदर एजन्सीने वेळकाढूपणा करुन रत्याचे काम पुर्ण न करता वाळूंज शिवारातील एक किलोमिटरचा रस्ता अपूर्ण ठेवला आहे. या खाजगी एजन्सीकडून वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारी वरीष्ठ पातळीवर करण्यांत आल्या आहेत. बाहयवळण रस्त्याच्या नियोजीत कामसाठी प्रकल्प आराखडा व अंदाजपत्रकाचे काम खाजगी एजन्सीला देण्यांत आले आहे. हे काम पूर्ण झालेल्या सांगण्यांत येते. प्रत्यक्षात मात्र या एजन्सीकडून हा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागातील कार्यालयाकडून देण्यांत आली आहे. सदर एजन्सीने वाळूंज पासून एक किलोमिटर अंतराचे काम अपुर्ण ठेवले असल्यामुळे रोडलगत असलेल्या शेतातील पिके, हॉटेल व्यवसायीक हे अपूर्ण कामामुळे व खराब रोडवरील वाहतूकीच्या धुळीमुळे हैरान झालेले आहेत. शेतातील शेतमाल, भाजीपाला पिके यांचे नुकसान होत आहे. रोडलगतचे हॉटेल व्यवसायीकांचे धूळीमुळे प्रचंड हाल होत आहेत. तरी वाळूंज परीसरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य, तसेच वाळूंज ग्रामस्थांच्या सख्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले ., येत्या आठ दिवसांत सदर एक किमी रस्त्यांचे काम पुर्ण न झाल्यास परीसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने 8 फेब्रुवारी  रोजी नगर सोलापूर महामार्गावर सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यांचा इशारा दिला आहे .
यावेळी बाजार समिती उपसभापती .संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर,महादेव शेळमकर,.सुखदेव  दरेकर, मकरंद हिंगे, अमोल गायकवाड,अनिल मोरे,.रमेश दरेकर, रोहिदास पाडळे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment