साहीत्य संमेलनाचा मान नाशिकलाच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

साहीत्य संमेलनाचा मान नाशिकलाच

 साहीत्य संमेलनाचा मान नाशिकलाच

नाशिक ः अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन मार्च महीन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा करून निश्चित करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनासाठी नाशिकची 2, सेलूचे 1 आणि पुण्याचे 1 तसेच अंमळनेरचे 1अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेरनिमंत्रण पाठवले होते. साहित्य महामंडळाने स्थळनिवडीचची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून 94 व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे.

No comments:

Post a Comment