“चांद सुलताना”च्या बेकायदा चेअरमनच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

“चांद सुलताना”च्या बेकायदा चेअरमनच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी.

 “चांद सुलताना”च्या बेकायदा चेअरमनच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील ए.टी.यु.चाँद सुलताना हायस्कुल या संस्थेचे चेअरमन म्हणून संपुर्ण शहरामध्ये मिरवणार्‍या नजीर अहमद उर्फ नज्जु पैलवान यांनी संस्थेचे कायदेशीर रित्या चेअरमन नसताना सन 1995 पासुन चेरअमनद असल्याचे भासवुन संस्थेमध्ये केलेल्या बेकायदेशिर कारभराची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे सय्यद अरबाज हुसेन एजाज यांनी केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, नजीर अहमद उर्फ नज्जु पैलवान हे गुंड प्रवृत्तीचे जोरावर चाँद सुलताना शाळेमध्ये अनधिकाराने चेअरमन म्हणून लोकांमध्ये मिरवीत असून नज्जु पैलवान यांच्यावर किडनॅपींग, खंडणी, दंगल घडविणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आदीसह गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. नज्जू पैलवान यांनी धर्मादाय आयुक्तांकडे चेअरमनपदासाठी केलेला अर्ज रद्द करण्यात आलेला आहे.
नज्जू पहिलावर हे चेअरमन नसतानाही स्वयंषोघीत चेअरमन म्हणून संस्थेचे बेकायदेशीर रित्या काम करीत आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या कार्यालयात देखील त्यांचा बदल अर्ज रेकॉर्डवर नसतांनाही आपणाकडुन संस्थेचे चेअरमन या नात्याने बनावट कागदपत्रांचे अधारे शिक्षकांचे पगार, नेमणुक, बढती बदली अशी कार्यवाही बेकायदेशीर रित्या होत आहे. याला आळा बसवा यासाठी संस्थेची चौकशी व्हावी अशी मागणी सय्यद अरबाज हुसेन एजाज यांनी निवेदनात केली आहे.

No comments:

Post a Comment