कोरोनाच्या काळात पत्रकारांचे कार्य मोठेच- प्रा. मोडक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

कोरोनाच्या काळात पत्रकारांचे कार्य मोठेच- प्रा. मोडक

 कोरोनाच्या काळात पत्रकारांचे कार्य मोठेच- प्रा. मोडक

पत्रकार सेवा संघाच्यावतीने आरोग्य तपासणी ः नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांची दंत, रक्तगट तपासणी शिबिर.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पत्रकार दिनानिमित्ताने संपादक, पत्रकार सेवा संघाने भाईसथ्था नाईट स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले. पत्रकार दिनी मुलांची आरोग्य तपासणी करणारा हा नगर जिल्ह्यातील पहिलाच कार्यक्रम आहे. कोरोनाचे संकट आले आणि सर्वजण घायळ झाले होते. त्याकाळामध्ये पत्रकारांनी मोठे समाजकार्याचे काम केले.आज पत्रकार संघाने विद्यार्थ्यासाठी आरोग्य शिबिर घेतले आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले पत्रकार दिनानिमित्ताने प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघाच्यावतीने पटवर्धन चौक येथील हिंद सेवा मंडळाचे ज्युनिअर कॉलेज भाईसथ्था नाईट स्कूलमध्ये आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक होते. यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, भाईसथ्था नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, दंत चिकित्सक डॉ.मंगेश जाधव, शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. प्रशांत शिंदे, नाईट स्कूलचे प्राचार्य सुनिल सुसरे, दैनिक नगर स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागाचे सचिव मन्सूर शेख, अशोक झोटींग, वेंदात लॅबचे वियाल खेडकर, अरुण पालवे, शुभम पाचारणे, अन्सार सय्यद, प्रशांत शिंदे, शब्बीर सय्यद, राजेंद्र येंडे, समीर मन्यार, उदय जोशी, बाबा ढाकणे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.
यावेळी नाईट स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.पारस कोठारी यांनी संस्थेचे विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम तसेच नाईट स्कूलमध्ये दिवसभर काम करणार्या विद्यार्थी नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थाचे पदाधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात असे सांगून त्यांनी नाईट स्कूलचा विकासाचा आलेख मांडला. संपादक, पत्रकार सेवा संघाने मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले हा उपक्रम विद्यार्थ्यासाठी फायद्याचा असल्याचे त्यांची सांगितले. संपादक, पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दै.नगर स्वतंत्रचे संपादक प्रा.सुभाष चिंधे यांनी पत्रकार दिन नेहमी साजरा होतो, यंदा मात्र विद्यार्थ्याचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. तसेच संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जात असल्याचे ते म्हणाले. डॉ.अनिल बोरगे यांनी कोरोनाच्या काळात पत्रकारांनी केलेले काम खरच कौतुकास्पद आहे. काळजी घ्या कोविड बरा होतो असे सांगून ते म्हणाले दिवसभर काम करणारे विद्यार्थी रात्र शाळेत शिक्षण घेतात. त्याच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघाने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकेच्यावतीने सर्व विद्यार्थ्याची मोफत कोविड चाचणी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी पत्रकार विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेतात ही बाब महत्त्चाची असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सुनिल सुसरे यांनी मानले. दंत चिकित्सक डॉ. मंगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. रक्तगट तपासणी विशाल खेडकर यांनी केली यावेळी डॉ. प्रशांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान कोविडमध्ये मृत्यु झालेल्यांना श्रद्धाजंली वाहिण्यात आली.

No comments:

Post a Comment