सावता परिषदच्या वतीने प्रा.माणिक विधाते यांचा सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

सावता परिषदच्या वतीने प्रा.माणिक विधाते यांचा सत्कार.

 सावता परिषदच्या वतीने प्रा.माणिक विधाते यांचा सत्कार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावता परिषद अहमदनगर शहर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश महासचिव मयुरराजे वैद्य, प्रदेशाध्यक्षा मनिषाताई सोनमाळी, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांच्या मार्गदर्शनाने सत्कार करताना सावता परिषदेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर समवेत शहर अध्यक्ष नितीन डागवाले, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम लोंढे, सरचिटणीस गुलाब गायकवाड, पारनेर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष पृथ्वीराज कोल्हे, श्रीकांत देडगे, तालुका अध्यक्ष युवक आघाडी संदीप गाडीलकर आदीसह सावता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.  
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते हे जिल्ह्याचे भूषण आहे तर ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात व आम्हाला सामाजिक कार्यात मोलाची मदत करतात समाजातील नेतेमंडळी हे समाजाचे आधारस्तंभ आहेत व येणार्‍या काळात त्यांच्या हातून असेच समाजसेवेचे कार्य घडो असे त्यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment