हल्दीराम शॉपीला नगरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळेल : कचरदास सुराणा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

हल्दीराम शॉपीला नगरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळेल : कचरदास सुराणा

 हल्दीराम शॉपीला नगरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळेल : कचरदास सुराणा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दर्जेदार व स्वादिष्ट मिठाई निर्मीतीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या तसेच या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड नागपूर येथील हल्दीराम मिठाईच्या शॉपीला नगरकर निश्चीतच उत्तम प्रतिसाद देतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यापारी कचरदास सुराणा यांनी केले.
प्रेमदान चौक येथे सुरु करण्यात आलेल्या हल्दीराम शॉपीचे उद्घाटन श्री सुराणा यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. श्री सुराणा पुढे म्हणाले की, दर्जेदार मिठाईसाठी हल्दीराम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता या शॉपीमुळे त्यांच्या सर्व प्रकारच्या मिठाया व अन्य उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना खाद्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
हल्दीराम शॉपीचे संचालक जितेंद्र भंडारी अधिक माहीती देतांना म्हणाले की, नागपूर येथील सुप्रसिद्ध हल्दीराम मिठाई दर्जेदार असल्याने त्यास ग्राहकांची चांगली मागणी आहे. मधुमेह असणार्‍या ग्राहकांसाठी कंपनीने खास मधाचा उपयोग करून शुगर फ्री मिठाई तयार केली आहे. शुगर फ्री मिठाईस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हल्दीरामच्या उत्पादनांविषयी माहीती देतांना मोसमी भंडारी म्हणाल्या की, हल्दीरामची संत्र्यापासून बनवलेली संत्रा बर्फी विशेष प्रसिद्ध आहे.

No comments:

Post a Comment