श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

 श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

प्रत्येकाने देशाबाबत कर्तव्याची जाण ठेवावी - मीनाक्षी भालेराव


नगर -
श्री समर्थ विद्या मंदिरच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वास्थ्य हॉस्पिटलमधील परिचारिका श्रीमती मीनाक्षी भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या समर्थ पूजनानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत, झेंडागीत संपन्न झाले. यानंतर सर्वांनी संविधानाचे पठण केले.
प्रास्ताविक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. किशोर देशपांडे होते. अतिथी व अध्यक्षांचा सत्कार सौ. सोनटक्के यांनी केले, तर परिचय संकेत शिंदे सर यांनी करून दिला.
यावेळी बोलताना श्रीमती मीनाक्षी भालेराव म्हणाल्या की, भारत हा एकात्मतेचा देश आहे. भारत देशाला जर पुढे न्यायचे असेल, तर कोरोनाशी दोन हात करायला हवेत. देशाबाबतचे आपल्या कर्तव्याची जाण ठेवून तसे कार्य केले पाहिजे, असे सांगितले.
अ‍ॅड. किशोर देशपांडे यांनी सैनिकांइतकेच कोरोना यौद्धे देखील महत्त्वाचे आहेत. एकता व एकात्मता असेल, तर देशाला यश निश्चितच प्राप्त होते, असे सांगितले.
कार्यक्रमास प्राथमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन क्षीरसागर सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कासार सर उपस्थित होते. सूत्रसंचालन संकेत शिंदे सर यांनी केले, तर आभार प्रशालेतील शिक्षक एल. एम. कुलकर्णी यांनी मानले.

No comments:

Post a Comment