2000 मनं जुळविण्याचे अवघड काम कुटे सरांनी केलंय ः डॉ. कळमकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

2000 मनं जुळविण्याचे अवघड काम कुटे सरांनी केलंय ः डॉ. कळमकर

 2000 मनं जुळविण्याचे अवघड काम कुटे सरांनी केलंय ः डॉ. कळमकर

मराठी  सोयरीकचं नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला घरातील 1 लग्न जुळविणे फार कठीण होते. अशावेळी मराठी सोयरीक ग्रुपच्या माध्यमातुन 2000 मनं जुळविण्याचं अवघड काम मराठी सोयरीक चे अध्यक्ष  अशोक कुटे सरांनी केले आहे असे उदगार   मराठी  सोयरीक  हया सर्व जातींसाठी नवीन मोबाइलच्या पच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. संजय कळमकर यांनी  काढले.  महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या नगर तालुक्याचे ञैवार्षिक अधिवेशन नगरमध्ये कोहिनुर मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी मराठी सोयरीक संस्थेने सर्व जातींसाठी  नवीन सुरू केलेल्या ‘मराठी सोयरीक’ ह्या मोबाइल अ‍ॅपचे लाँचींग झाले. शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, मा.रा.या. औटी (राज्य उपाध्यक्ष), तसेच जिल्हाध्यक्ष संजय धामणे, गुरूकुलचे जिल्हाध्यक्ष मा सुदर्शन शिंदे, उच्चाधिकारचे जिल्हाध्यक्ष नितीन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, सुनीता काटकर, प्रमोद झावरे, प्रविण बेलदार, भैय्या कोठुळे व अखिल भारतीय मराठी सोयरीकचे संस्थापक अशोक कुटे ह्या मान्यवरांच्या हस्ते मोबाईल अ‍ॅपचे लाँचिंग झाले.
या उद्घाटन प्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे सर म्हणाले की, ह्या मोबाइल अ‍ॅप मुळे अनेक पालकांना घरबसल्या हवे तसे स्थळे पाहण्यास सहज सोपे होणार आहे. मराठी सोयरीकने सातत्य, जिद्द, प्रामाणिकपणा ठेवल्याने यामुळे ही संस्था राज्यात प्रसिद्ध झाल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे यांनी सांगितले. तसेच उच्चाधिकारचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन काकडे यांनी समाजाचा ज्वलंत व अवघड प्रश्न हाती घेतल्याने अशोक कुटे व त्यांच्या टीमचे कौतुक केले.
प्रमोद झावरे, प्रविण बेलदार, भैय्या कोठुळे, राजेंद्रजी ठाणगे, संभाजी औटी, अंबादास मंडलिक, सलीम शेख, अरूण कडुस, संतोष शिंदे, संतोष सुंबे, नकुल कुटे, प्रा योगेश कोतकर, धनराज गुंड , मधुकर निकम, अंजली पठारे, अर्जुन झरेकर, जयश्री कुटे इ. अनेक सदस्यांचे बहुमोल सहकार्य ह्या पसाठी मिळाले असे प्रसिद्धीपञकात म्हटले आहे. डिझाईनर ज्ञानेश्वर कोठुळे यांनी हे अ‍ॅप बनवले असून अडचणीसाठी 8453902222 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment