60टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 19, 2021

60टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा

 60टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा

शिवसेना नेते शशिकांत गाडेंचा दावा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात  झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साठ टक्के ग्रामपंचायतीं महाविकास आघाडीच्या ताब्यात आला असल्याचा दावा शिवसेना नेते प्रा.शशिकांत गाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
गाडे म्हणाले,तालुक्यातील एकूण 59 ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतीं बिनविरोध झाल्या तर 56 ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या.  यामध्ये बत्तीस -तेहतीस ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले. तर दोन-चार ग्रामपंचायतीं 4-3 झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत मा. आ. कर्डीले यांना हा मोठ्ठा धक्का असून जनरल मतदानामध्ये महाविकास आघाडीची ताकद मोठी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. याअगोदर महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीं फार थोडया होत्या. परंतु जेऊर सारख्या गटातून इमामपूर, धनगरवाडी, डोंगरगण या ग्रामपंचायतीं आमच्या ताब्यात आल्या आहेत. बुर्‍हाणनगर मध्ये पॅनल उभा राहिला हेच आमच्यासाठी महत्वाचे असून लवकरच येत असलेल्या सोसायटी निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी ताकदीने लक्ष घालणार असल्याचे सूतोवाच प्रा. गाडे यांनी केले. नगर बाजार समिती शेतकर्‍यांची राहिली पाहिजे हा महाविकास आघाडीचा हेतू असून बाजार समिती दूध संघासारखी विकली जाऊ नये  यासाठी ग्रामपंचायतीत लक्ष घातले असल्याचे प्रा. गाडे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, तालुका काँग्रेस अध्यक्ष संपतराव म्हस्के, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे,  जि. प. सदस्य संदेश कार्ले, जि. प. उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment