लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयास 25 बेंचेस भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयास 25 बेंचेस भेट

 लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयास 25 बेंचेस भेट

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संकटानंतर सर्वच क्षेत्रात आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना, सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत आहे. आजची लहान मुले उद्याचे भविष्य असून, शिक्षणाने त्यांची व समाजाची प्रगती साधली जाणार आहे. ही भावना लक्षात घेऊन लायन्स क्लब वंचितांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. श्रमिक कामगारांची मुले शिक्षण घेत असलेल्या मार्कंडेय शाळेस बेंच भेट देण्यात आले असल्याची भावना लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष मल्लेश नल्ला यांनी व्यक्त केली.  
श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयास प्रजासत्ताक दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने 25 बेंचेसची भेट देण्यात आली. प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष मल्लेश नल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ.रत्ना बल्लाळ, ज्येष्ठ विश्वस्त शरद क्यादर, खजिनदार जयंत रंगा, विश्वस्त सविता कोटा, राजेंद्र म्याना, जितेंद्र वल्लाकटी, महापालिकेचे सभागृह नेते मनोज दुलम, माजी नगरसेविका वीणाताई बोज्जा, श्रमिक जनता हाउसिंग सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, व्हाईस चेअरमन दत्तात्रय भीमनाथ, सचिव शंकर येमुल, लायन्स क्लबचे सचिव हेमंत नरसाळे, राजकुमार गुरुणानी, महेश पाटील, हरीश हरवानी, डॉ. सुदर्शन गोरे, संजय आडेप, मीना नरसाळे, सोनी रंगलाणी, मीना हरवानी, डॉ.हेमा सुराणा, संगीता नल्ला आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment