मनुष्यास ऑक्सिजनरूपी जीवन देण्याचे कार्य वृक्ष करतात ः डॉ. अनिल बोरगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

मनुष्यास ऑक्सिजनरूपी जीवन देण्याचे कार्य वृक्ष करतात ः डॉ. अनिल बोरगे

 मनुष्यास ऑक्सिजनरूपी जीवन देण्याचे कार्य वृक्ष करतात ः डॉ. अनिल बोरगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  मनुष्यास ऑक्सिजनरूपी जीवन देण्याचे कार्य वृक्ष करतात. सजीवसृष्टीत वृक्ष पर्यावरण समतोल साधण्याचे कार्य करतात. वृक्षांची कत्तल झाल्याने निसर्गाचा समतोल ढासळला असून, वृक्ष रोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छता व वृक्ष संगोपन ही एकमेकांना पूरक संकल्पना आहे. कोरोना महामारीच्या सद्यस्थितीत स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांवर मात करता येते. स्वच्छ शहर, सुंदर हरित शहर (गाव) ही संकल्पना सर्वांच्या सहभागाने यशस्वी होणार आहे. यासाठी सर्व नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जय युवा अकॅडमी, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) आयोजित बुरुडगाव रोड येथील आयटीआय महाविद्यालयात हरित शहर स्वच्छ शहर (गाव) व राष्ट्रीय मतदार जागृतीवर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बोरगे बोलत होते. रोपांना पाणी देऊन या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, कासाचे प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, आयटीआयचे प्राचार्य सुनील शिंदे, उपप्राचार्य व्ही.एम. प्रभूणे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी आर.वाय. पवार, उदय सूर्यवंशी, मनपा वृक्ष अधिकारी उद्धव म्हसे, हरियालीचे सुरेश खामकर, मनपाचे मतदार दूत मंजू नवगिरे, पिचड, नागापुरे, आधारवडच्या अ‍ॅड. अनिता दिघे, पोपट बनकर, रजनी ताठे, डॉ.धीरज ससाणे, नयना बनकर, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, आरती शिंदे, अ‍ॅड. सुनिल तोडकर आदी उपस्थित होते. मनपा मतदार दूत मंजू नवगिरे यांनी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ दिली.

No comments:

Post a Comment