कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, सलून व्यावसायिकांची आ. संग्राम जगताप यांच्याकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, सलून व्यावसायिकांची आ. संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

 कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, सलून व्यावसायिकांची आ. संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

 


नगरी दवंडी

अहमदनगर : कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या टाळेबंदीच्या काळात सलून व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.टाळेबंदी टप्प्या टप्प्याने शिथील झाल्यानंतर राज्यातील सलून व्यावसायिकांनी शासन निर्देशांचे पालन करीत आपल्या सेवा सुरु केल्या आहेत. तसेच  ग्राहकांच्या आरोग्याची दक्षता घेत उपाय योजना केलेल्या आहेत. सलून सेवा ही महत्वाची असून या निमित्ताने दररोज मोठा ग्राहकांचा संपर्क येतो. त्यामुळे शासनाने कोरोना लसीकरण सुरु केल्यानंतर सलून व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सलून व्यावसायिकांना आ संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टचे विकास मदने, अहमदनगर जिल्हा सलून चालक मालक असो. चे जिल्हाध्यक्ष जनार्दन वाघ, संजय मदने, शेख सत्तार, भाऊसाहेब काळे, गणेश कदम, शिवाजी दळवी, अजय कदम, निलेश शिंदे, अशोक खामकर, सुनिल खंडागळे, किशोर मोरे, सुरेश राऊत आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment