पैशाचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग करणाऱ्या आमदारांवर कायदेशीर कारवाई करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

पैशाचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग करणाऱ्या आमदारांवर कायदेशीर कारवाई करावी

 पैशाचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग करणाऱ्या आमदारांवर कायदेशीर कारवाई करावी.



नगरी दवंडी


अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील सध्या 767 ग्रामपंचायती निवडणूक जाहीर झालेली असताना ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे. या विषयावर स्थानिक आमदार ग्रामपंचायतींना 10 लाख ते 25 लाख असे आम्ही दाखवून सदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसे जाहीर आव्हान त्यांनी वर्तमानपत्राद्वारे सुद्धा केले आहे,अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे आदर्श आचार संहितेचा भंग तर आहेच तसेच लोकशाहीचा खून आहे.पैशाचे प्रलोभन दाखवून निवडणुका बिनविरोध करणे हे घटनाबाह्य असून धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांच्या फायद्याचे आहे ग्रामपंचायतीची निवडणूक ही मोठ्या संघर्षाची असते गावागावात मतभेत आणि गावाचा खुंटलेला विकास हे स्थानिक आमदार माहित असून देखील ते समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कारण वंचित समूह हा पैशाची राजकारण करू शकत नाही हे माहीत असल्यामुळे काही आमदार पैशाच्या व सत्तेच्या जोरावर वंचितांची मुस्कट दाबी करत आहेत,ज्यांना ग्रामपंचायत सदस्य व्हायचे असेल तर ५० हजार रुपये व सरपंच व्हायचे असेल त्यांनी १ लाख रुपये निधी गावासाठी द्यावयाचा आहे, यासाठी इच्छुकांची नावे घेऊन सोडत काढली जाईल अशा प्रकारच्या घटनाबाह्य ऑफर आमदाराकडून दिल्या जातात. त्यामुळे वंचित दुर्लक्षित घटकांना आपला उमेदवार सदस्य आणि आपल्या मतदानातून निवडून येण्याची संधी सर्वसामान्य मतदारांना मिळणार नाही अशा पद्धतीने निवडणुका बिनविरोध झाल्या तर सदस्य निवडीचा अधिकार मतदारांना राहणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य वंचित दुर्लक्षित भटक्या समाजाच्या मतदारांना विश्वासात घेऊन ग्रामसभेत ठराव करीत राज्यघटनेप्रमाणे निवडणुका होऊ द्याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आले आहे. "ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व लाख रुपये मिळवा" अशा प्रकारचे आश्वासने/आव्हाने करणारे लोकप्रतिनिधी आचारसंहितेचा भंग करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जर उद्या कदाचित बिनविरोध निवडणुकांचा टक्का वाढला तर हे लोकप्रतिनिधी राज्य सरकारच्या तिजोरीवर मध्ये खडखडाट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कुठून व कसा देणार? निधी स्वरूपात येणारा पैसा पुढाऱ्यांच्या घरचा नसून कर स्वरूपात सर्वसामान्य जनतेकडून मिळालेला निधी आहे या पैशाचा गैरवापर करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार हे आमदारांना नाही.

   ज्या लोकप्रतिनिधींनी निवडणुका प्रभावित करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले आहे,त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाने सदर वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे पद रद्द करुन टाकावे असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सुप्रीम कोर्टात व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे असे वक्तव्य करणाऱ्या आमदार विरुद्ध लोकहित याचिका दाखल करण्यात येईल तरी माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वक्तव्याचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर आमदारांवर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

No comments:

Post a Comment