स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय व सामजिक कार्य अफाट समुद्राप्रमाणे -ना. रामदास आठवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय व सामजिक कार्य अफाट समुद्राप्रमाणे -ना. रामदास आठवले

 स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय व सामजिक कार्य अफाट समुद्राप्रमाणे -ना. रामदास आठवले

ना. आठवले यांच्या हस्ते अजिंक्य योध्दा पुस्तकाचे व आयुष्य फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे प्रकाशन


अहमदनगर -
स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनप्रवासावर लिखीत अजिंक्य योध्दा (हुंदक्यांना आठवणींची किनार) या पुस्तकाचे तसेच आयुष्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.
सावेडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले ना. आठवले यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पुस्तकाचे लेखक इंजि. जनार्धन जायभाय, माजी सैनिक संघटनेचे शिवाजी पालवे, सिध्दार्थ सिसोदे, अ‍ॅड.सुमेध डोंगरे, डॉ.सुरेखा जाधव, अ‍ॅड.संदिप जावळे, संतोष शिंदे, भास्कर गोपाळघरे, चंमपती मोरे, भगवान डोळे, भाऊसाहेब देशमाने, रामकृष्ण काकडे, हरिदास भाबड, खंडेराव लेडाळ, नारायण जायभाय आदिंसह माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.
ना. रामदास आठवले म्हणाले की, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय व सामजिक कार्य अफाट समुद्राप्रमाणे आहे. आजच्या युवकांसाठी ते खर्‍या अर्थाने एक आयडॉल आहेत. सामाजिक कार्य व संघटन कसे असावे? त्यांच्या कार्यातून शिकण्यासारखे आहे. खर्‍या अर्थाने ते राजकारणात अजिंक्य योध्देच होते. नवीन संघटनेची मुहुर्तमेढ रोवत असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा व कार्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अजिंक्य योध्दा या पुस्तकाचे प्रकाशक नवनरेंद्र प्रकाशन आहे. या पुस्तकात लोकनेते स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडण्यात आला असून, ते आजच्या युवकांना व कार्यकर्त्यांना दिशादर्शक आहे. यामध्ये त्यांच्या बालपणीच्या, महाविद्यालय जीवनाच्या, राजकीय व सामाजिक जीवनप्रवासातील घटनांचा समावेश आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानासह भावनिक मुद्दयांना देखील हात घालण्यात आला आहे. सामाजिक प्रश्‍न सोडवून दुर्बल घटकांना आधार देत त्यांचे आयुष्य सुखी बनविण्यासाठी युवकांनी एकत्रित येऊन आयुष्य फाउंडेशची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शैक्षणिक, पर्यावरण आदि क्षेत्रात कार्य केले जाणार असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक तथा फाऊंडेशनचे इंजि. जनार्धन जायभाय यांनी दिली.

No comments:

Post a Comment