सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर व थुंकणार्‍यांवर सीसीटीव्हीची नजर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर व थुंकणार्‍यांवर सीसीटीव्हीची नजर

 सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर व थुंकणार्‍यांवर सीसीटीव्हीची नजर

घनकचरा विलगीकरणासाठी महापालिका सरसावली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियानात यश संपादन करण्यासाठी मनपा अधिकारी व कर्मचारी झोकून देऊन काम करावे, मनपा कर्मचा-यांनी घरगुती कच-याचे विलगीकरण करुन कंपोस्ट तयार करण्याचे नियोजन करावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर तसेच अस्वच्छता पसरविणा-यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी व यांच्यावर आता मनपा ठिकठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला असून आता रस्त्यावर कचरा टाकणा-यांवर सिसिटीव्ही कॅमे-याची नजर राहणार असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई  करण्याचे आदेश मनपा आयुक्त मा.श्री.श्रीकांत मायकलवार यांनी विभागप्रमुखांच्या साप्ताहिक आढावा बैठकित दिले.
शहरातील दैनंदिन कचरा उचलला जात आहे. परंतु ओला व सुका कच-याचे विलगीकरण होत न नसल्याने त्यावर प्रक्रीया करणे व विल्हेवाट लावणे अवघड होत असल्याने यावर मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून त्या दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. यासाठी मनपा कर्मचा-यांपासून घरगुती कंपोस्ट खत प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले. या माध्यमातून इतरांनीही कंपोस्ट खत निर्मिती करावी त्यामुळे आपल्या बाग बगींच्यांना ते खत वापरता येईल. यामाध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. ओला व सुका कच-याचे विलगीकरण करण्यासाठी घंटागाडीमध्ये सुविधा उपलब्ध नाही यासाठी नगरशहरातील जनतेला दिवसा आड सुका व ओला कच-याचे नियोजन करून जनतेमध्ये जनजागृती करावी. यामुळे ओला व सुका कचरा विलगीकरण होण्यास मदत होईल. नागरिकांनी  या अभियानामध्ये भाग घेवून नगर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यामार्फत शहरामध्ये नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी नियोजन करावे व विद्यार्थ्यांची स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी स्पर्धा घेण्यात यावी. असे ते म्हणाले.  देखील दिवसाआड ओला सुका कचरा घंटागाडीत टाकावा असे नियोजन करण्यात येत आहेत.
याबैठकीस उपायुक्त श्री.संतोष लांडगे, श्री.सचित राऊत, श्री.सिनारे, आरोग्याधिकारी डॉ.श्री.अनिल बोरगे, वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ.श्री.सतिष राजूरकर, घनकचरा विभाग प्रमुख  डॉ.श्री.नरसिंह पैठणकर, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, यंत्र अभियंता श्री.परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख राहिदास सातपुते, आस्थापना विभाग प्रमुख श्री.मेहेर लहारे, नगररचनाकार राम चारठाणकर, अभियंता श्री.वैभव जोशी, प्रभाग अधिकारी श्री.अशोक साबळे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर श्री. मिसाळ आदी  उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment