कोरठणला चंपाषष्टी साधेपणाने व भक्तिमय वातावरणात साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, December 20, 2020

कोरठणला चंपाषष्टी साधेपणाने व भक्तिमय वातावरणात साजरी

 कोरठणला चंपाषष्टी साधेपणाने व भक्तिमय वातावरणात साजरी 

     


नगरी दवंडी

               

 नगर- प्रती जेजुरी समजल्या जाणार्या  व राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  पिंपळगाव रोठा ता.पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानला २३ व्या वर्षाचा चंपाषष्ठी महोत्सव कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यतं साधेपणाने व सर्व शासकीय नियम पाळून साजरा झाला यानिमित्ताने सोशल डिस्टन्स पाळत आलेल्या भाविकांनी आपल्या कुलदैवताचे चंपाषष्ठीची पर्वणी साधून खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले  

                     पहाटे  श्री खंडोबा स्वयंभू मुर्ती व बारा लिंगे यांना मंगलस्नान पुजा करण्यात आली यानंतर चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्तीचे सिंहासनावर साजशृंगारात अनावरण करण्यात आले यानंतर महाअभिषेक पुजा व महाआरती  करण्यात आली यावेळी यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले यानंतर मंदिरात होम हवन झाले

               दिंडी, महाप्रसाद,चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य  मंदिर  व कोरठण गड प्रदक्षिणा मिरवणूक ,हरिकिर्तन, सत्संग प्रवचन हे सर्व कार्यक्रम यावर्षी करण्यात आले नाही .

                  

               

No comments:

Post a Comment