पारनेर तालुक्यातील या ग्रामपंचायत बिनविरोध
आ. लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतील निर्णय
नगरी दवंडी
पारनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पानोली व कारेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय रविवारी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पारनेर येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा गावासाठी २५ लाख रुपयांचा निधी घ्या अशी घोषणा केल्यानंतर त्यांच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मायभूमी असलेल्या राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन आ. लंके यांना प्रतिसाद दिला. दरम्यान, तालुक्यातील सुमारे वीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रक्रियेत असून येत्या दोन दिवसात आणखीही काही गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील असे चित्र असल्याचे ऍड. राहुल झावरे यांनी सांगितले. कारेगाव व पानोली ग्रामस्थांनी आज बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला.
आ. लंके यांच्या या भूमिकेचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी स्वागत केले असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून काम करण्याची घोषणाही हजारे यांनी केली आहे. दरम्यान आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनीही आ. लंके यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेतली आहे.
No comments:
Post a Comment