रोटरी क्लब मिड टाऊनच्या अत्याधुनिक डायलिसीस सेंटरची लवकरच उभारणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

रोटरी क्लब मिड टाऊनच्या अत्याधुनिक डायलिसीस सेंटरची लवकरच उभारणी

 रोटरी क्लब मिड टाऊनच्या अत्याधुनिक डायलिसीस सेंटरची लवकरच उभारणी


नगर –
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन येत्या नवीन २०२१ वर्षात नगर शहरात सर्वसामान्य गोर गरीब, गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक डायलिसिस सेंटर लवकरच उभारणार आहे. रोटरी क्लबच्या " ग्लोबल ग्रँट " या उपक्रमांतर्गत नगरच्या रोटरी क्लब मिड टाऊनच्या वतीने प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या उपक्रमाला द रोटरी फाउंडेशनने त्वरित मान्यता देत ५ अत्याधुनिक डायलिसिस मशीन करता सुमारे ४० लाख रुपयांचा निधी रोटरी क्लब मिड टाऊन ला मंजूर केला आहे. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मियामी हा अमेरिकेतील क्लब फॉरेन पार्टनर झाला आहे. नगर शहरातील गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य किंवा अत्यल्प दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोटरी क्लब मिड टाऊन क्लबने सुचवलेल्या या प्रोजेक्टला अमेरिकेतील क्लबने आणि रोटरी इंटरनॅशनल ने अर्थ सहाय्य केले आहे. लवकरच नगरच्या मॅक केअर हॉस्पिटल मध्ये हे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर सुरू करणार असल्याची माहिती अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी दिली आहे.

यानिमित्त रोटरी मिड टाऊ क्लबच्या झालेल्या मीटिंगमध्ये डायलिसिस मशीन घेण्यासाठी ३५ लाख रुपयांचा धनादेश रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांनी क्लब कडे सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष क्षितिज झावरेसचिव दिगंबर रोकडेप्रमोद पारीखमनीष नय्यरसतीश शींगटे आदींसह सदस्य उपस्थित होते. या मोठ्या उपक्रमासाठी प्रमोद पारीखविजय इंगळे परिश्रम घेतले. पुढील महिन्यात हे डायलिसीस सेंटर पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार असून यासाठी मॅक केअर हॉस्पिटल मधील डॉ. आनंद काशीद तसेच व्यवस्थापन यांचे सहकार्य असणार आहे.

क्लबच्या या सेवा कार्याचे कौतुक करतांना प्रांतपाल हरिष मोटवानी यांनी नगर शहरामध्ये कोविडचा प्रदुर्भाव सर्वात जास्त असतांनाच्या काळात रोटरी कोविड केअर सेंटरचे उभारणी करून सुमारे १५२४ रुग्णांना विनामूल्य उपचार क मोफत सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रोटरीच्या वतीने आता डायलिसिस सेंटरचे उभारणी हा या वर्षातील दुसरा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. नगर शहराच्या सेवेत रोटरी हा शब्द रोटरी क्लब मिड टाऊन खऱ्या अर्थाने सार्थ ठरवीत आहे, असे गौरोद्गार काढले.

गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी रोटरी कडे नावनोंदणी करणे आवश्यक असूनजिल्ह्यातील रुग्णांनी सचिव दिगंबर रोकडे मो.९९२१२२६०१६ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन रोटरीच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment