पदाचा उपयोग समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी करावा - सचिन नवगिरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

पदाचा उपयोग समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी करावा - सचिन नवगिरे

पदाचा उपयोग समाजातील प्रश् सोडविण्यासाठी करावा सचिन नवगिरे

क्रांतिगुरु लहुजी महासंघाच्या नुतन पदाधिकार्यांची निवड


नगर
 - महाराष्ट्रात दिवसेंदिवस समाजावर अन्याय अत्याचाराची मालिकाच सुरू आहे ती थांबली पाहिजेसमाजाच्या न्याय हक्कविविध सामाजिक प्रश्नांसाठी क्रांतीगुरु लहुजी महासंघ लढा देत आहे.  या संघटनेत काम करतांना खर्या अर्थाने पदाचा उपयोग समाजातील प्रश् सोडविण्यासाठी  झाला पाहिजेमहासंघाची ध्येय-धोरणे समाजापर्यंत पोहचवून महासंघाशी सर्वसामान्यांना जोडण्याचे काम नवीन पदाधिकार्यांनी करावेअसे प्रतिपादन क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन नवगिरे यांनी केले.

     क्रांतिगुरु लहुजी महासंघ सामाजिक संघटनेच्या बैठक नुकतीच भिंगार शहरात नुकतीच पार पडलीयाप्रसंगी सचिन नवगिरे पदाधिकारी  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होतेयावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सचिन नवगिरे जिल्हाध्यक्ष मयूर लोखंडे  जिल्हा युवा अध्यक्ष राहुल सकट उपस्थित होतेया कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या आदेशानुसार प्रमुख पाहुणे सचिन शिरसाठ यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करुन पत्र देण्यात आलेत्यात अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास साळवेपारनेर तालुका संघटकपदी अमोल साळवेनगर तालुका संपर्क प्रमुखपदी अनिल वैराळ यांची निवड करण्यात आली.

     समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी संघटना प्रभावी माध्यम असून शैक्षणिक चळवळ उभी करण्यासाठी युवकांनी एकसंघ होणे गरजेचे असल्याचे लहुसंग्राम प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक सचिन शिरसाठ यांनी सांगितले.           यावेळी जिल्हाध्यक्ष मयूर लोखंडे,  युवा अध्यक्ष राहुल सकटलहुसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गायकवाडमानवहित लोकशाही पार्टीचे भिंगार शहराध्यक्ष कैलास साळवेमारुती वैराळशंकर पवळसागर वैराळनिशांत ननवरेमनेश ननवरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment