मंदिरात आत्मिक समाधान- देवकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

मंदिरात आत्मिक समाधान- देवकर

 मंदिरात आत्मिक समाधान- देवकर

अरणगावमधील पुरातन श्री दत्त मंदिरात नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतासह महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ व दत्त संप्रदाय श्री दत्त उपासना करतात. अवधूत हे दत्ताचे नाव असून, त्याचा अर्थ नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा असा आहे. दत्ताच्या पाठीमागील गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान चार वेदांचे प्रतीक आहे. दत्तांनी पृथ्वीला आपले गुरू मानले. प्रत्येकाने पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे. अग्निप्रमाणे देह हा क्षणभंगूर आहे. प्रत्येक वस्तुत परमेश्वराचे अस्तित्त्व असते. श्रीपाद श्रीवल्लभ पहिला, नृसिंह दुसरा व स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असून, जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमीनाथ म्हणून पूजन करतात. मंदिरात गेल्यानंतर खर्‍या अर्थाने आत्मिक समाधान मिळते, असे प्रतिपादन श्री. भानुदास देवकर यांनी केले.
अरणगाव येथील 100 वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त नवीन मूर्तीची प्र्राणप्रतिष्ठापना करून भाविकांना महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ भानुदास देवकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. रेवणनाथ पवार, गोरख गहिले, छाया गहिले, सोमनाथ गहिले, कोमल गहिले, काशिनाथ गहिले, जालिंदर गहिले, कविता गहिले, फकिरा जाधव, गोरख कल्हापुरे, नरेंद्र भामरे, बापू पवार, विजय शिंदे, सुरेश नाट, बाबासाहेब भांबरे, अंकुश गव्हाणे, प्रितम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गोरख गहिले म्हणाले की, अरणगाव ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या ठिकाणी परिसरातील व आसपासच्या गावातील अनेक श्री दत्त भक्त दर्शनासाठी येतात. श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment