मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

 मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः एमआयडीसी येथील मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या नियमांचे पालन करत आज दत्त जयंती एमआयडीसी येथे साजरी करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांनी दिली.
    दत्त जयंती निमित्त आज सकाळी 10 ते 12.30 श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. यानंतर श्रींची महाआरती व पाळणा, यानंतर दुपारी 1 च्या दरम्यान महापालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना कोठारी म्हणाले की, सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळा साजार करण्यात आला आहे. परंतु सध्याच्या वातावरणामुळे शक्यतो अनेकांनी यंदा पुजन करुन घरीच जयंती साजरी केली.

No comments:

Post a Comment