भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. अहिरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. अहिरे

 भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी डॉ. अहिरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः भारतीय विस्तार शिक्षण सासायटीच्या उपाध्यक्षपदासाठी देशात नुकतीच ऑनलाईन निवडणूक पार पडली. ही निवडणूक देशामध्ये चार विभागात घेण्यात आली. डॉ. मिलिंद अहिरे यांनी पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधुन निवडणूक ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यामध्ये डॉ. मिलिंद अहिरे यांना सर्वात जास्त 80 टक्के मते पडून ते विजयी झाले.
डॉ. मिलिंद अहिरे सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि कृषि विस्तार आणि संवाद विभागाचे प्रमुख आहे. त्यांनी 2005 साली जी.बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातुन पीएच.डी. संपादन केली आहे. कृषि विद्यापीठात त्यांना विविध पदांचा 24 वर्षाचा अनुभव असुन ते विद्यापीठाचा महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा भाकृअप समन्वय अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आणि विद्यापीठाच्या नियोजन, मुल्यमापन आणि देखरेख प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन सक्षमपणे काम पाहिले आहे. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एजुकेशनच्या सहसचिवपदी त्यांची नेमणुक असुन सोसायटी ऑफ कृषि विज्ञानच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणुन ते काम बघत आहे. धुळे येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणुन त्यांनी चार वर्ष शेतकरीभिमुख विस्तार कार्य केले आहे. त्यांना विस्तार विभागाचा मानाचा समजला जाणारा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार आणि उत्कृष्ठ विस्तार व्यावसायीक या राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्यांनी आतांपर्यंत 14 एम.एस्सी. (अ‍ॅग्री) आणि 6 पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कृषि विद्यापीठाचे प्रसारण केंद्र प्रमुख असताना त्यांनी विविध विद्यापीठ प्रकाशनांचे संपादन केले आहे. यामध्ये कृषिदर्शनी, श्रीसुगी, कृषिवार्ता असे अनेक प्रकाशनांचे संपादन त्यांनी केले आहे. कृषि विद्यापीठाच्या तसेच राज्यस्तरीय विविध समित्यांवर त्यांची तज्ञ सल्लागार आणि सदस्य म्हणुन नेमणूक आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यामध्ये मानाचा समजला जाणारा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे आतांपर्यंत 100 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले असुन विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांचे शेतकर्यांसाठी 60 हून अधिक कृषि विषयक लेख वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment