जाणता राजा प्रतिष्ठानचे समाजरत्न पुरस्कार समाजाला दिशादर्शक ःमहंत सुनिलगिरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 17, 2020

जाणता राजा प्रतिष्ठानचे समाजरत्न पुरस्कार समाजाला दिशादर्शक ःमहंत सुनिलगिरी

 जाणता राजा प्रतिष्ठानचे समाजरत्न पुरस्कार समाजाला दिशादर्शक ःमहंत सुनिलगिरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः जाणता राजा प्रतिष्ठाणचे पुरस्कार हे समाजाला दिशा देणारे व समाजामध्ये नि:स्वार्थी काम करणार्‍यार्‍यांना प्रेरणा व उमेद देणारे आहेत असे प्रतिपादन महंत सुनिलगिरीजी महाराज यांनी केले.
 नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाण आयोजित मातोश्री स्व.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी खासदार तुकाराम गडाख हे कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जि.प.माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ज्ञानेश्वरचे संचालक जनार्दन पटारे,सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार, भाजपा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, सचिन देसरडा,दिनकर गर्जे, बाळासाहेब भणगे, सयाजी ढवाण, संभाजी माळवदे,अशोक बोरा, तुकाराम काळे, सतिष मुळे, सरपंच सौ.मीनाताई जोजार, नामदेव खंडागळे, श्याम पुरनाळे, शरद आरगडे, अशोक टेकणे, नाना टाके, विश्वास काळे, संजय तुपे, अशोक कदम, मनोज पारखे, मानव साळवे, अमोल साळवे, पोपट शेकडे, देविदास पटारे, सोमनाथ शेंडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उल्लेखनीय सामाजिक कामाबद्दल लक्ष्मणराव मोहिटे यांचा भानसहिवरे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. दिनकर गर्जे, रावसाहेब कांगुणे, विठ्ठलराव लंघे, तुकाराम गडाख यांची भाषणे झाली.
जाणता राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे यांनी प्रास्ताविक केले.राजेंद्र कीर्तने यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. रेवन्नाथ पवार व प्रा.राजेंद्र शेटे यांनी केले.

या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर असल्याने चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला होता. विशेषतः माजी खासदार तुकाराम गडाख यांनी सगळ्यांचीच फिरकी घेतली.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here