व्यंकटेश मल्टिस्टेट संस्थेच्या दिनदर्शिकेचे आ.काळे यांच्या हस्ते प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

व्यंकटेश मल्टिस्टेट संस्थेच्या दिनदर्शिकेचे आ.काळे यांच्या हस्ते प्रकाशन

 व्यंकटेश मल्टिस्टेट संस्थेच्या दिनदर्शिकेचे आ.काळे यांच्या हस्ते प्रकाशन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  व्यंकटेश मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात व्यंकटेश उद्योग समुहाच्या नवीन वर्ष 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुरेश चव्हाण (गजराज ड्रायक्लीनर्स), डॉ अविनाश मोरे (किर्ती उदयोग समुह), मनोज देशमुख (ख्यातनाम विधीतज्ञ), प्रा.गणेश देशमुख, गणेश शिंदे ( युवा व्याख्याते), ज्ञानेश शिंदे (डिझायन), अशोक डोळसे ( प्रसिद्ध खडू शिल्पकार), गणेश दळवी (गणेश प्रिंटर्स), सुमित कुलकर्णी ( शहर अध्यक्ष विधानसभा सदस्य राष्ट्रवादी युवा काँग्रेस), योगेश बेळगे (इलेव्हन 24) तसेच उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे, संचालक व्यंकट देशमुख, कृष्णा मसुरे, अनिल गुंजाळ व व्यंकटेश परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थित होते.
याप्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले, आ. आशुतोश काळे यांनी उद्योग समूहाचे कौतुक करताना सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग आपला उद्योग समूह दाखवून देत आहे. दिनदर्शिका ही आपली दिनचर्या ठरवत असते. त्यामुळे दिनदर्शिका ही महत्वाचा घटक आहे. व्यंकटेश समुहाने तयार केलेली दिनदर्शिका मार्गदर्शक ठरेल. व्यंकटेश मल्टीस्टेटचे काम दिवसेंदिवस दैदिप्यमान आहे, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी चेअरमन अभिनाथ शिंदे म्हणाले, व्यंकटेश मल्टीस्टेट ही  बँकिंग क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. एक लाखापेक्षा अधिक संस्थेचे सभासद आहेत. अ.नगर, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये  एकूण 22 शाखांचे विस्तीर्ण जाळे पसरलेले आहे. नोटबंदी पासून संस्थेने डिजिटल बँकिंगचा वापर करून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत  सुविधा  पोहोचण्यासाठी  मोबाईल अँप , इंटरनेट बँकिंग , आधार कार्ड वरती पैसे काढणे अशा विविध  सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

No comments:

Post a Comment