नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करणार -आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करणार -आ.संग्राम जगताप

 नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करणार -आ.संग्राम जगताप

प्रभाग क्र.11 मधील राऊत मळा येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ


नगर -
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती, परंतु आता विकास कामांची सुरुवात झाली असून, नगरमध्येही ही कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे भविष्यात नगरमध्ये चांगले कामे उभी राहतील. यासाठी आपण प्रयत्नशिल असून, नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करण्यात येत आहेत. त्यासाठी नगरसेवक अविनाश घुले व मी स्वत: मुंबईत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री ना.हसन मुश्रिफ यांना भेटून नगरच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर या भागातील सोलापूर रोड ते एमएसईबी पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या निधीची गरज असून, लवकरच तो उपलब्ध करुन ते काम मार्गी लावू. शहराचा नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊ. नगरसेवक अविनाश घुले सर्वसामान्यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अशा स्वरुपाच्या कामातून एक आदर्श प्रभाग निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

     प्रभाग क्र.11 मधील राऊत मळा येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, जगन्नाथ राऊत, गोविंदराव सांगळे, भिमराव रासकर, बबन राऊत, बबन अजबे, बाबासाहेब राऊत, महादेव अजबे, रामचंद्र रासकर, संदिप पालवे, बाबासाहेब काळे, जयंत थोपटे, हंसराज चौधरी, गोविंद गायकवाड, शंकरराव हिरणवाळे, सोमनाथ डाळवाले, राहुल काळे, बाबू रासकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, प्रभागातील प्रत्येक भागाचा विकास करण्याचा आपण कसोसीने प्रयत्न करत आहोत. सर्व नागरिकांना मुलभुत सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत. राऊत मळा येथील रस्ता करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आज पूर्ण होत आहेत.  प्रभागात चांगले विकास कामे करुन नागरिकांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील. आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने प्रभागातील कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रभाग आदर्शवत करण्याचा आपण प्रयत्न आहे.

     याप्रवसंगी जगन्नाथ राऊत म्हणाले, राऊत मळा या परिसरात रस्त्याची मोठी दुरावस्था होती. नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडे पाठपुरवा केल्याने आज हा रस्ता होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठी सोय या रस्त्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन अजबे यांनी केले तर आभार बाबू रासकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment