मानव अधिकार न्यायिक सुरक्षा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रविण भंडारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

मानव अधिकार न्यायिक सुरक्षा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रविण भंडारी

 मानव अधिकार न्यायिक सुरक्षा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रविण भंडारी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मानव अधिकार न्यायिक सुरक्षा संघ, नवी दिल्ली (ह्युमन राईट) संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण भंडारी यांची संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भंडारी यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष तरूण शर्मा यांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवर संघटनेत महत्त्वाच्या पदावर संधी देत त्यांचा बहुमान केला आहे. नारायणगव्हाण येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भंडारी अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यही आहेत.
प्रविण भंडारी हे आंतरराष्ट्रीय गोमाता सेवा महासंघ, नवी दिल्ली, माँ आशापुरा ट्रस्ट, जैन श्रावक संघ नारायणगव्हाण, भारतीय गौ संवर्धन परिषद नवी दिल्ली, जनसंघ सेवक मंच महाराष्ट्र प्रांत, जैन राजनैतिक चेतना मंच नवी दिल्ली, राष्ट्रीय नमो सेना महाराष्ट्र, प्रोगे्रसिव्ह ग्रुप, स्वदेशी सनातन संघ नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अशा राज्य व देशपातळीवरील अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. साधूसंतांच्या सेवेची त्यांना विशेष आवड असून सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. प्रत्येक संस्थेत कार्यरत राहून त्यांनी ठसा उमटविण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment