चांगल्या सुविधा मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थी उत्तुंग भरारी घेतील : मुथा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

चांगल्या सुविधा मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थी उत्तुंग भरारी घेतील : मुथा

 चांगल्या सुविधा मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थी उत्तुंग भरारी घेतील : मुथा

इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्यावतीने सोनेवाडी जि.प.शाळेस भरीव मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. या गुणवत्तेला चालना मिळण्यासाठी मुलांना आवश्यक सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे. यातून त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होवू शकतो. हीच बाब ओळखून इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळांना मदत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मदतीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी  आणखी वाढून ते भविष्यात उत्तुंग भरारी घेतील, असा विश्वास क्लबच्या अध्यक्षा योगिता मुथा यांनी व्यक्त केला.
इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून केडगाव-सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला संगणक संच, प्रिंटर, झेरॉक्स मशिन, हात धुण्यासाठी वॉश बेसिन, वाचनालयासाठी उत्तम पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी क्लबच्या अध्यक्षा योगिता मुथा, माजी अध्यक्षा प्राजक्ता डागा, केंद्रप्रमुख धामणे, मुख्याध्यापिका धामणे, हरिश्चंद्र दळवी, नंदू दळवी, गायकवाड मॅडम, चौधरी सर, बांदल मॅडम, इंगळे सर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मुलांसमवेत केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
मुथा पुढे म्हणाल्या की, इनरव्हिल क्लब सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यादृष्टीने क्लब विशेष प्रयत्न करीत असून आधुनिक शैक्षणिक साहित्यामुळे मुलांमध्ये शिकण्याचा उत्साह निर्माण होईल. सोनेवाडी शाळेसाठी भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न राहिल.
मुख्याध्यापिका धामणे यांनी इनरव्हिल क्लबच्या या मदतीबद्दल आभार मानले व अशा उपक्रमातून मुलांना अधिक चांगल्या प्रकारे आधुनिक शिक्षण देता येणार असल्याचे सांगितले. शेवटी प्राजक्ता डागा यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment