राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने गुरुवारी वेबिनारचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने गुरुवारी वेबिनारचे आयोजन

 राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने गुरुवारी वेबिनारचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः ग्राहक हितासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यात ग्राहक संरक्षण अधिनियम-2019, दि 20जुलै, 2020 पासून लागू करण्यात आला आहे.  केंद्र शासनाने यावर्षी साजरा करावयाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त छशु ऋशर्रीीींशी जष लेर्पीीाशी िीेींशलींळेप -लीं, 2019 ही संकल्पना निश्चित केली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारव्दारे 24 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमास वेबिनार माध्यमाव्दारे तालुका तहसिल कार्यालयेही ऑनलाईन जोडली जाणार आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेच्या निर्देशांचे अधीन राहूनच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी/खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तालुका कार्यक्रम आयोजित करतांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना सर्व तहसिल कार्यालयांना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी कळविले आहे. 


No comments:

Post a Comment