ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जाने. स्थानिक सुट्टी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जाने. स्थानिक सुट्टी जाहीर

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जाने. स्थानिक सुट्टी जाहीर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हयामध्ये शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी 767 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे मतदान होणार आहे. त्याअर्थी जिल्हयातील 767 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या संबधित निवडणूक क्षेत्रातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी होणार्या सार्वत्रिक निवडणूकी साठीचे मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment