खळबळ जनक बातमी कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळलेल्या इंग्लंड मधून नगर मध्ये 11नागरिक दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

खळबळ जनक बातमी कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळलेल्या इंग्लंड मधून नगर मध्ये 11नागरिक दाखल

 खळबळ जनक बातमी

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळलेल्या इंग्लंड मधून नगर मध्ये 11नागरिक दाखलनगरी दवंडी

इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे.

  इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात विविध ठिकाणी इंग्लंडहून ११ जण आल्याची माहिती समोर आली आहे. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून, त्यांची कोरोना चाचणी होणार आहे.इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील ०२, कराचीवालानगरमधील ०४, गुलमोहोर रोडवरील ०३, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा एकूण ११ जणांचा यात समावेश आहे. नगरमधील हे प्रवासी ०७, ०९, १२, १४, २१ आणि २२ डिसेंबरला आली आहेत.या सर्व नागरिकांची महापालिकेतर्फे कोरोना आरटीपीआर चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एऩआयव्ही पुणे येथे पाठविणार आहे या तपासणीत जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा पुढील २८ दिवस करता होईल. या प्रवाशांच्या सहवासितील लोकांचा शोध घेऊन सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment