मराठा महासंघाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निलेश दरेकरांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

मराठा महासंघाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निलेश दरेकरांची निवड

 मराठा महासंघाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निलेश दरेकरांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी पदी निलेश दरेकर यांची नियुक्ती स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी नुकतीच केली.
डॉ. टकले यांच्या   नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यात मराठा समाजातील तरुणांचा संघटीत करून हि चळवळ बळकट करण्यासाठी तसेच स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम करेन  असे निलेश दरेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे तालुका भरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment