बोल्हेगाव ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्ता सिमेंट कॉक्रिट करणार ः आढाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

बोल्हेगाव ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्ता सिमेंट कॉक्रिट करणार ः आढाव

 बोल्हेगाव ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्ता सिमेंट कॉक्रिट करणार ः आढाव

स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर लगेच कामास सुरूवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून स्व.शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रेरणेने व युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या मार्गदशनाखाली व  नगरसेवक आकाश कातोरे, दत्ता सप्रे, अशोक बडे, निलेश भाकरे  व सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून हे काम करत आहोत बोल्हेगाव ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्ता नसून खड्ड्यांचा रस्ता झाला होता. सध्या तात्पुरता स्वरूपाचा मुरूम टाकून सुरू करत आहोत.ज्याप्रमाणे गणेश चौक ते बोल्हेगांव फाटा सिमेंट कॉक्रिटचा रस्ता झाला त्याप्रमाणेच हा रस्ता करणार असल्याचे सांगितले. समाजाचे देणे आहे कारण त्यांनी आम्हाला मतदान केले आहे.त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्यामुळे हा रस्ता लवकरच सिमेंट कॉक्रिटचा करणार आहोत असे प्रतिपादन  स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांनी केले.

शिवसेनेच्या माध्यमातून स्व.शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रेरणेने व युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मदन आढाव यांच्यावतीने मुरूमीकरणास प्रारंभ करण्यात आला तसेच यावेळी बंद स्टिट लाईटची पाहणी करून कामास सुरूवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक आकाश कातोरे,निलेश भाकरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे व अभियंता ठोंबे उपस्थित होते.
     यावेळी बोलताना निलेश भाकरे म्हणाले की, गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरवस्था आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे.
        आकाश कातोरे म्हणाले की,वॉड नंबर 6 मध्ये बोल्हेगाव फाटा ते गणेशचौक येथे ज्या पध्दतीने आंदोलन करून रस्ता केला त्या पध्दतीने हाही रस्ता करणार आहोत.लोक पडण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे म्हणून शिवसेनेच्या वतीने काही दिवसापूर्वी आंदोलनही केले होते.लवकरच रस्ता करण्याचे आश्वासन मिळाले होते. वारंवार मागणी केली परंतू तोपर्यत नागरिकांची गैरसोय होउ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने मलमपटटी म्हणून मुरूमीकरणाचे काम करत आहोत.
     स्विकृत नगरसेवक मदन आढाव बंद स्टिट लाईटकरीता सकाळपासून पाठपुरावा करत होते यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत शिवसेना व स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या या कामाला शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment