अनेक मुस्लिम युवकांनी केला पक्षप्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

अनेक मुस्लिम युवकांनी केला पक्षप्रवेश

शिवसेनेचा आलेख वाढतच चालला

अनेक मुस्लिम युवकांनी केला पक्षप्रवेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये शिवसेनेची वाढती प्रतिष्ठा पुन्हा आता उजळूलागली आहे. शिवसेनेनी केलेल्या विकास कामामुळे शिवसेनेकडे मुस्लीम समाजाच्या अनेकांनी  काल औरंगाबाद येथील महाराष्ट्र शिवअल्पसंख्याकचे समन्वयक समीर जावेद कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये जुनामंगळवार बाजारातील हतौकल वस्ताद तालीम येथील इम्रान बशीर सह अनेकांनी प्रवेश केला.
  दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून शहरातील शिवसेनेचे काम आधिक जोमाने करणार असल्याचा निर्धार आलेल्या मुस्लिम युवकांनी केला.यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजीमहापौर अभिषेक कळमकर,परेश लोखंडे,संतोष गेनाप्पा, दत्ता जाधव,गिरीष जाधव,शशीकांत देशमुख,दिपक कावळे, महेश शेळके,सुमित धेंड,मनोज चव्हाण,आलीम शेख, शेबाज शेख, अरबाज शेख, टायर शेख, सलमान शेख, फैजन शेख, अमीर शेख, सुलतान शेख,अब्दुल गफर,अमन शेख, शब्बीर शेख सह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या नगर शहरातील विविध विकास कामांबरोबरच आता पक्ष पातळीवर अनेक जन शिवसेनेकडे येऊ इच्छित आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील 40 युवकांनी शिवसेनेकडे येण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यानंतर स्थानिक पदाधिकारी आणि या युवकांची एकत्रित बैठक होऊन त्या युवकांनी शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश करून शिवसेनेचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा प्रवेशाचा कार्यक्रम पारपडला.
याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले 35 वर्षापूर्वी शिवसेने एक बी नगर शहरामध्ये रवला होता.तो बी म्हणजे स्व.अनिल राठोड त्यांनी आपल्या कष्टाने नगर शहरात शिवसेनेच एक मजबूत मोठे वृक्ष निर्माण केले आणि महाराष्ट्रात मोबाईल आमदार म्हणून स्वताची ओळख निर्माण केली. त्यांच्या मार्गावर चालून  नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करू आणि नगरमध्ये शिवसेनेची ताकद कायम वाढवत राहू. असे सांगितले.

No comments:

Post a Comment