पक्षातील फुटीरवाद्यांनी आत्मपरीक्षण करावे ः गणेश कवडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 2, 2020

पक्षातील फुटीरवाद्यांनी आत्मपरीक्षण करावे ः गणेश कवडे

 पक्षातील फुटीरवाद्यांनी आत्मपरीक्षण करावे ः गणेश कवडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
काका शेळकेंचा विरोध हा फक्त मराठा समाजसाठीच आहे, असा आरोप नगरसेवक गणेश कवडे यांनी केला आहे. संपर्क प्रमुखांच्या बदलीबाबत शेळके यांचा बोलविता धनी कोण, शिवसैनिक व नगरकरांना माहिती आहे.शिवसेनेत जातीयवादाचा थारा दिला जात नाही. शिवसेनेकडून अनिल भैय्या राठोड व अनिल देसाई यांनी स्वीकृतसाठी दिलेले नावे निश्चित करण्यात आली.स्वीकृत सदस्य निवडीवरुन सावेडी विभाग प्रमुख शेळके यांनी जातीयवादाचा आरोप केला होता. त्याला नगरसेवक गणेश कवडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
     कवडे पुढे म्हणाले की दुसर्‍या पक्षातून शिवसेनेत आलेले काका शेळके व पक्षातील काही पदाधिकार्‍यांनी ‘फुटीरवादी’ कोण आहे, याचे स्वतःच आत्मपरीक्षण करावे. सावेडी विभागप्रमुख झाल्यापासून सावेडी विभागात संघटनेसाठी केलेल्या कामाचा त्यांनी खुलासा करावा. सावेडी विभागाची परिस्थिती पाहता तेथे शाखाप्रमुख व कुठलीही कार्यकारणी अद्याप नेमणूक केली नाही.याकडे दुर्लक्ष करत फक्त जातीयवाद करुन पक्षात व समाजात तेढ निर्माण करायचे एवढेच कामे करण्यात पुढाकार घेतात, पक्षातील काही जणांकडून मनमानी चालू संपर्कप्रमुख व शहरातील नगरसेवक हे वरिष्ठांचे आदेश पाळणारे एक सच्चे शिवसैनिक आहेत.
     आजवर संघटना वाढीसाठी वेळेवेळी आम्ही एकजुटीने प्रयत्न केले आहेत. परंतु शिवसेना शहरप्रमुख व त्यांच्या गटातील काही नगरसेवक व पदाधिकारी हे त्यांची मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचेच निर्णय अंतिम मानतात. त्यात ते स्थानिक पातळीवर पक्षातील इतर नगरसेवक व कार्यकर्ते यांचे मत विचारात घेत नाहीत. यासर्वांबाबत शहरप्रमुख कुठलीही कठोर भूमिका घेत नाहीत, असा आरोपही कवडे यांनी दिलीप सातपुते यांच्यावर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख यांच्याकडे सदस्य नोंदणी फॉर्मची मागणी केली असता ते उपलब्ध करून दिले नाहीत. जाती-पातीचे राजकरण दुसर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करतात. त्यांच्या या वागणुकीमुळे आम्ही नगरसेवक व पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन शहरप्रमुख बदलीची मागणी करणार आहोत. मागणीबाबत पत्राद्वारे पक्षश्रेष्ठींशी बोलणी झाली असल्याचेही कवडे यांनी म्हटले आहे.


No comments:

Post a Comment