शिर्डीतील पोलीस व पारनेरमधील 3 वनअधिकारी गजाआड, गुन्हे दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

शिर्डीतील पोलीस व पारनेरमधील 3 वनअधिकारी गजाआड, गुन्हे दाखल

 शिर्डीतील पोलीस व पारनेरमधील 3 वनअधिकारी गजाआड, गुन्हे दाखल

अँटीकरप्शन ब्युरोकडुन 2 ट्रॅप...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सरकारी कार्यालयात नागरीकांनी कामे करून घेण्यासाठी लाच मागण्याच्या घटना जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारी कामासाठी लाच मागणे गुन्हा असताना सर्वसामान्य नागरिकांकडे कामासाठी लाच मागितली जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. पाच हजारांची लाच घेताना शिर्डी येथील पोलिसाला रंगेहात पकडण्यात आले असून दुसरी घटना पारनेरमध्ये वन विभागाच्या तीन अधिकार्‍यांना लाचलुचपत पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या भावाच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या तपासात झालेल्या खर्चापोटी 5 हजारांची लाच स्विकारताना शिर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रविण दिलीप अंधारे, (वय 33 वर्ष, नेमणूक - शिर्डी पोलिस स्टेशन. रा- गणेश निकम यांचे घरी भाड्याने , नांदुरख़ी रोड, गणेश वाडी, शिर्डी, ता. राहता. मुळ राहणार बोधेगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर ) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कामगिरी केली. पारनेर येथील  वनपरिक्षेत्र  कार्यालयांमध्ये  वन विभागाच्या तीन अधिकार्‍यांना  लाचलुचपत पथकाने  लाच घेताना  रंगेहात पकडले यामुळे पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली होती याबाबत  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने पारनेरच्या प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात मोठी कारवाई करीत एकाच वेळी 3 लाचखोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नगर ते मुंबई स्मशानभूमीसाठी लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर तो सोडण्यासाठी लाच मागून 30 हजारांची रक्कम स्विकारल्याने दोन वनसंरक्षक व एका महिला वनपाल एसीबीच्या जाळ्यात अडकले. राजेंद्र माधवराव जाधव वय .45 वनसंरक्षक वर्ग -3.श्रीमती पल्लवी सुरेश जगताप वय .35 वनपाल वर्ग -3 आणि बाळु श्रीधर सुंभे वय. 42 वनसंरक्षक फिरते पथक वर्ग .3 अशी आरोपीची नावे आहेत. तक्रारदार हे अहमदनगर ते मुंबई स्मशानासाठी लाकुड पुरवठा करतात.त्यांचा लाकडाचा ट्रक कारवाई करणेसाठी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर येथे विभागीय वन अधिकारी दक्षता नाशिक यांनी जमा केला होता.
 शिर्डी येलि घटनेची हकीकत अशी की आरोपी लोकसेवक यांच्याकडे तक्रारदार यांचे भावाचे मृत्यू संदर्भात दाखल असलेल्या अ.मृ चे तपासामध्ये आरोपी लोकसेवक यांनी केलेल्या खर्चापोटी तक्रारदार यांचे कडे लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराने ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून सापळा कारवाई दरम्यान रु 5000/- लाचेची रक्कम पंचासमक्ष शिर्डी पोलिस स्टेशन आवारात स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले.पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक करांडे यांच्या पथकाने सापळा रचला होता.
पारनेर येथील घटनेची हकीकत अशी की,सदर ट्रक सोडणेसाठी आरोपी राजेंद्र जाधव याने 30000रु. लाचेची मागणी करुन ती दि. 9 रोजी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर अ.नगर येथे स्विकारली. आरोपी पल्लवी जगताप यांनी यासाठी रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले व आरोपी बाळू सुंभे याने 50000 रू ची मागणी करून त्यापैकी 25000रू स्विकारल्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आहे.ला.प्र.वि, नाशिकच्या पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, पोनि. उज्ज्वल पाटील, पोनि. किरण रासकर, पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, मोरे, पोना.बाविस्कर, पोना. शिंपी यांच्या पथकाने सुनील कडासने, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, दिनकर पिंगळे पोलीस अधीक्षकनाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक या करीत आहेत.


No comments:

Post a Comment