एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे भाष्य... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे भाष्य...

 एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे भाष्य...

राष्ट्रवादी’मध्ये योग्य व्यक्तीचा सन्मानच !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘राष्ट्रवादीमध्ये योग्य लोकांचे नेहमी स्वागतच केले जाते. आपला पक्ष कर्तव्यवान माणसाला नेहमी स्वीकारत असतो. प्रत्येक पक्षात कर्तव्यवान लोक असतात. त्या दृष्टीकोनातून मला वाटते की कोणी पक्षात येऊ इच्छित असतील, तर राष्ट्रवादीच्या नेते मंडळीनी जिल्ह्याजिल्ह्यामध्ये चांगल्या लोकांना वाट करून दिली पाहिजे,’ असे सांगतानाच, ‘मी एका व्यक्तीचे नाव घेणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादीमध्ये एखादी व्यक्ती आल्यावर याचा अर्थ राष्ट्रवादीच्या कुठल्याही त्या-त्या जिल्ह्यातील लोकांवर बाधा येईल किंवा ते मागे पडतील, असा कोणताही भाग नसतो. आपल्याला पक्षही वाढवायचा असतो. सर्वांना घेऊन काम करायचे असते, व ती मानसिकता ठेवण्याची आवश्यकता आहे,’ असेमत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
टोपे हे मुंबई येथून जालना येथे जात असताना काही वेळासाठी नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षात नाराज असून ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. खडसे लवकरच कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ स्वीकारतील, असे बोलले जात आहे. या अनुषंगाने भाजप मधील एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी सूचक भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योग्य लोकांचे नेहमी स्वागतच आहे. आमचा पक्ष कर्तृत्ववान माणसाला नेहमीच स्वीकारत असतो, असे टोपे म्हणाले. अधिक भाष्य मात्र त्यांनी टाळले.राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना धार्मिक स्थळे कधी उघडणार?, शाळा कधी उघडणार?, व्यायामशाळांना परवानगी कधी मिळणार?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या अनुषंगाने त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.’राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया’, असे ही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवत असताना मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. 50 टक्के ग्राहक क्षमतेच्या अटीवर हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. एसटी सोबतच खासगी बस वाहतूकही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यात आता धार्मिक स्थळे, शाळा, व्यायामशाळा आणि मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत कधी होणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्याबाबत विरोधकही सातत्याने मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीरपणे या सर्वाचा विचार करत असून राज्याची त्यादिशेने वाटचाल सुरू झाल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर ’कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे’, असंही आवाहन सुद्धा टोपे यांनी केलं.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीआरपी प्रकरण तसंच भाजपवर देखील टीका केली. ’काही न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे, असे मत यांनी व्यक्त केले. तसंच कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याची काम काही चॅनल्सने केला. त्यामुळे त्यांच्यावर कठोरतील कठोर शिक्षा होण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले.’मास्क छ 95 हा बाजारात 150 ते 200 रुपयाला मिळतो परंतु, त्याची बनविण्याची किंमत 12 रुपये इतकी आहे. एमआरपी नुसार तो 19 रुपयांपर्यंत विकला पाहिजे’, असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात सारख्या पुरोगामी राज्याला हे बिल्कुल मान्य नाही. त्यामुळे आता त्यासाठी समिती स्थापन करून अशा विक्रेत्यांना दिशा, आणि निर्देश दिल्याचे देखील टोपे यांनी यावेळी सांगितले.
‘राज्य सरकार हे अंत्यत पारदर्शकपणे व जेवढ्या जमेल तेवढ्या कार्यक्षमतेने करोना काळात काम करण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यामधून लक्ष विचलित करण्यासाठी काही मंडळी जाणीवपूर्वक काम करीत असतील, तर ते निश्चित चुकीचे आहे,’ असा टोलाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण व कंगना प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करणार्‍या भाजपच्या नेत्यांना यावेळी लगावला.

No comments:

Post a Comment