टेम्पो व ट्रकची धडक, टेम्पोचालक जागीच ठार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 24, 2020

टेम्पो व ट्रकची धडक, टेम्पोचालक जागीच ठार

 टेम्पो व ट्रकची धडक, टेम्पोचालक जागीच ठार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः नगर-सोलापूर मार्गावर कर्जत तालुक्यातील पाटेगाव नजीक असणार्‍या अरुंद पुलावर ट्रक आणि टेम्पो च्या धडकेत टेम्पो चालक शंकर त्र्यम्बक कदम वय 36 रा चिंचवड  जि पुणे हे जागीच ठार झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेचा हा या आठवड्यातील चौथा बळी असून या रस्त्याचे काम कधी होणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सदर अपघात दि 23 ऑक्टो रोजी रात्री साडे आठ वाजता घडला आहे.
याबाबत वृत्त असे, नगर-सोलापूर मार्गावर पाटेगावलगत ओढ्यावर संरक्षक कठडे अथवा गार्ड स्टोन नसलेला अत्यंत अरुंद  पूल आहे. या पुलावर नगरहुन सोलापूर च्या दिशेने जाणारा टेम्पो एम एच 14 एफ टी/1293 ला समोरून येणार्‍या ट्रक एम एच 45 टी/5515 ची जोरदार समोरा समोर धडक झाली. या धडकेने अंधारात टेम्पो ओढयाच्या पात्रात कोसळला आणि चालकाच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला. यामुळे टेम्पो चालक कदम जागीच ठार झाले. याबाबत  मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रला माहिती मिळताच  पोलीस अँब्युलन्स घेऊन पोहोचले व त्यांनी टेम्पोचालक मयत कदम यांची बॉडी बाहेर काढून म्बुलन्स द्वारे शवविच्छेदना साठी पाठविली, यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. या अरुंद पुलावर आतापर्यंत शेकडो अपघात होत त्यात अनेक बळी गेले आहेत तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे त्यामुळे या रस्त्याच्या दुर्दशेकडे कधी लक्ष दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here