निघोज पतसंस्थेच्यावतीने सरपंच, उपसरपंचांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

निघोज पतसंस्थेच्यावतीने सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

 निघोज पतसंस्थेच्यावतीने सरपंच, उपसरपंचांचा सत्कार


नगरी दवंडी/वार्ताहर
निघोज  ः निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल निघोज नागरी सहकारी पतसंस्था परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच श्री. ठकाराम लंके यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन श्री. वसंत कवाद यांनी केला तर उपसरपंच श्री. बाबाजी लंके यांचा सत्कार संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नामदेव मामा थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
   यावेळी संस्थेचे संचालक श्री. शांताराम कळसकर यांनी सरपंच, उपसरपंच व त्यांच्या सहकार्‍यांनी  गावाच्या विकासासाठी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली.
सरपंच ठकाराम लंके यांनी स्वर्गीय श्री बाबासाहेब कवाद यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मी निघोज गावाचा चांगला विकास घडवून आणला त्यांनी यावेळी स्वर्गीय बाबासाहेब कवाद हे आज आपल्यात असते तर अजून चांगल्याप्रकारे त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले असते. यापुढील काळात आपण  सामाजिक , धार्मिक, राजकीय क्षेत्रात  चांगले काम करू, असे आश्वासन त्यांनी दिले. निघोज पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो.
यावेळी कन्हैया उद्योगसमुहाचे अध्यक्ष श्री. शांताराम मामा लंके, निघोज नागरी पतसंस्थेचे  संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, बहिरु कळसकर शांताराम कळसकर, अ‍ॅड. सुनिल मेसे, निघोज परीसर कृषी फलोद्यान संस्थेचे संचालक रामदासशेठ वरखडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, अधिकारी सुनिल तांबे, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन चंद्रकांत लंके, बन्सी गुंड गुरुजी, इत्यादी  मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे यांनी केले तर आभार श्री. रामदास वरखडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment