भानगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

भानगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा

 भानगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा

5 जुगार्‍यांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंचायत समितीच्या सदस्य पतीवर दोनदा गुन्हा
  भानगाव मध्ये यापूर्वी टाकलेल्या छाप्यात देखील सुरेश पंढरीनाथ गोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता पुन्हा गोरे हे जुगार खेळताना आढळले .त्यांच्याच वरदहस्त खाली लाखो रुपये उलाढाल जुगार अड्ड्यावर होत असल्याची माहिती मिळाली.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या ठिकाणी 16 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा  टाकून 5 जुगार्‍यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेला काही कालावधी होण्याच्या आगोदर पुन्हा एकदा श्रीगोंदा पोलिसांनी त्याच ठिकाणी  छापा टाकून  7 जुगार्‍यासह पुन्हा एकदा लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.विशेष म्हणजे दोन्ही वेळेस पंचायत समितीच्या सदस्यां पती व माजी उपसभापती  सुरेश गोरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी  16 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 जुगार्‍यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या घटनेला काही कालावधी उलटतोय तोच पुन्हा भानगावात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप याचे एका पथक तयार करून भानगाव या ठिकाणी छापा मारला असता 27 सप्टेंबर रोजी  भानगाव शिवारात,धनगरवस्ती जवळ एका पत्र्याचे उघडे शेडमध्ये तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना 7 जण आढळून आले त्यामध्ये अनिल मधुकर लगड वय 45 वर्षे, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदा, रवि गोविंद पाठक, वय 32 वर्षे, रा.वार्ड नं. 7 श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जावेद गुलाब बेपारी, वय 50 वर्षे, रा. खाटीकगल्ली श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, आयुब महमद शेख, वय 50 वर्षे, रा.श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा, स्वप्निल प्रविण पितळे, वय 25 वर्षे, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदा, बाळू आप्पा नवले, वय 37 वर्षे, रा.टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा, सुरेश पंढरीनाथ गोरे, वय 46 वर्षे, रा. भानगाव ता. श्रीगोंदा,जि.अहमदनगर हे तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 2,82,600/- रोख रक्कम 66,100, मोबाईल 41500 व चार मोटार सायकली 175,000 रुपये रोख व तिर्रट नावाचे जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment