शिल्पकार कांबळेंची गोदड महाराज समाधीस भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

शिल्पकार कांबळेंची गोदड महाराज समाधीस भेट

 शिल्पकार कांबळेंची गोदड महाराज समाधीस भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी कर्जत येथे भेट देत गोदड महाराजांच्या समाधी मंदिर व जन्मस्थळ मंदिराला भेट देऊन पाहणी करत उपस्थितांशी चर्चा केली.
    कांबळे यांनी अचानक कर्जत येथे भेट देऊन गोदड महाराज मंदिरात समाधीस्थळाचे दर्शन घेऊन पाहणी केली. जिल्ह्यात अनेक संत-महंत होऊन गेले असून यातील अनेक प्रसिद्धही झाले आहेत मात्र गोदड महाराजांची ख्याती अद्यापि म्हणावी अशी सर्वदूर पोहोचली नाही ती पोहोचणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मंदिराचे पुजारी गणेश काकडे यांनी गोदड महाराजांना बत त्यांना माहिती दिली तर यावेळी प्रसाद शहा, पत्रकार आशिष बोरा, भास्कर भैलुमे यांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर त्यांनी गोदड महाराजांच्या जन्मस्थळ मंदीराला भेट दिली, यावेळी त्यांनी मंदिराला दिलेल्या डोंगराच्या रूपाचे कौतुक केले. यावेळी माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले यांनी त्यांचे महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले, याप्रसंगी त्यांनी घुले यांना आपल्या कलाकृतीचा अल्बम दाखवून विविध विषयांवर चर्चा केली.
    कांबळे यांनी पत्रकार बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांनी उपस्थित मुलांसह सर्वांशी मनमुराद संवाद साधला, मुलांना त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे दिले व चित्रही काढून दाखवले. यावेळी बोराांच्या मातोश्री बसलेल्या होत्या त्याचे पाहता पाहता काही मिनिटात पेन्सिल चित्र काढून ते भेटही दिले. यावेळी बोलताना त्यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवताना वडिलांनी आपल्याला कलाकार करण्याचा निश्चय केला होता, असे म्हणत आमच्या चार पिढ्या कलेची साधना करत असल्याचे सांगितले. कलेमुळे आनंद मिळतो असे सांगत डॉक्टर, वकील घरोघरी पाहायला मिळतील मात्र कलाकार क्वचित पहायला मिळतात असे सांगत, सर्वांना कलेची साधना करण्याचा सल्ला दिलाॠ कांबळे यांनी अत्यंत दिलखुलास गप्पा मारत, सर्वाना मंत्रमुग्ध केलेॠ त्याऋची ही भेट अविस्मरणीय ठरल्याचे बोरा यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment