प्रभाग चारमधील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावी ः बोरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 9, 2020

प्रभाग चारमधील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावी ः बोरकर

 प्रभाग चारमधील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावी ः बोरकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
प्रभाग चारमधील अनेक भागात रस्त्यावरील विज नसल्याने येथील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची खंत व्यक्त करत लवकरात लवकर दिवे सुरु करावेत, अशी मागणी प्रभाग चारमधील नगरसेविका शोभा सुधाकर बोरकर यांनी आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. चारमधील तारकपुर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय रोड, गुलमोहोर रोड, नवलेनगर, स्वामी समर्थ मंदिर, तारकपूर इंदिरा कॉलनी, समता नगर, नरहरी रोड, आसरा हौसिंग सोसायटी, रिध्दी सिध्दी कॉलनी, नंदनवन फॉलनी, शिला विहार तरोच कोहिनूर मंगल कार्यालय परिसर,पंकज कॉलनी, किरलोस्कर कॉलनी परिसर, दळवी मळा, रामकृष्ण कॉलनी आदी भागात लाईट बंद असल्यामुळे अंधार असतो, यामुळे नागरीकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहण करावा लागतो.
वाहन चालकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच ट्रिट लाईट नसल्याने या भागात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार महानगरपालिका विद्युत विभागाकडे म्हणने मांडूनही काही उपयोग होत नसल्याने आपण या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून या भागातील स्ट्रिट लाईट सुरु करण्याचे आदेश द्यावेत या भागातील ट्रिटलाईट तीन दिवसात सुरु न झाल्यास परिसरात काही घटना घडल्यास याला प्रशासन जबादार राहिल असे म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment